कोकण

जातीवाचक शिवीगाळ; लोरेतील तिघांना अटक

CD

जातिवाचक शिवीगाळ;
लोरेतील तिघांना अटक
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २३ ः जमिनीच्या वादातून लोरे येथील सुमन कांबळे यांना जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांनी बाबासाहेब पाटील यांच्यासह तिघांना आज अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता १५ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. लोरे-मोगरवाडी येथील सर्व्हे क्रमांक १३८ या जमिनीवरून मधुकर कांबळे आणि बाबासाहेब पाटील यांच्यात वाद असून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. या जमिनीत असलेल्या विहिरीवर असलेला पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या सुमन कांबळे हिला श्री. पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जातिवाचक शिवीगाळ केली, अशी तक्रार सौ. कांबळे यांनी पोलिसांत दिल्यानंतर पोलिसांनी आज बाबासाहेब पाटील, पूजा बाबासाहेब पाटील आणि मुलगा दिग्विजय बाबासाहेब पाटील या तिघांना अटक केली. त्या तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL मधून 'इम्पॅक्ट प्लेयर'चा पत्ता कट होणार? बीसीसीआयच्या बड्या अधिकाऱ्याने दिले मोठे संकेत; पाहा काय आहे कारण

Instagram Rules 2026 : ...तर इंस्टाग्रामवर दिसणार नाही तुमची पोस्ट; कुणासाठी लागू होतोय हा नवा नियम? जाणून घ्या

Nasrapur Case Victim Father Statement: “माझ्या मुलीला न्याय मिळेपर्यंत येऊ नका” नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांनी राजकीय नेत्यांना फटकारलं

Shrirampur Crime: प्रेमसंबंधाच्या वादातून पोटच्या मुलाकडून वडिलांचा खून; श्रीरामपुरात धक्कादायक घटना, घरगुती कलहाचा थरारक शेवट!

Shaktipeeth Highway Protest : शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचा ठराव पूर्ण गावानेच घेतला, सांगली जिल्ह्यातील शेतकरी नितीन गडकरींची घेणार भेट

SCROLL FOR NEXT