कोकण

पावस ः ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन निसर्ग वाचवावा

CD

ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन निसर्ग वाचवावा
अॅड. पोतकर ; ग्रामसभांमध्ये जलसंवर्धन, जैवविविधतेवर चर्चा व्हावी
पावस, ता. २५ ः कोकणात पर्यटन वाढत असताना निसर्गाची काळजी घेऊन स्वच्छता, जलसंवर्धन व व्यवस्थापन, वनसंवर्धन व व्यवस्थापन करणे आवश्यक असून, आगीच्या भक्ष्यस्थानी पडणारे सडे, जंगले यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन निसर्ग वाचवावा, असे आवाहन अॅड. ज्ञानेश पोतकर यांनी केले आहे.
याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांनाही निवेदन दिले आहे. जंगलात वणवा हा नैसर्गिक नसून तो मानवनिर्मित असतो. काहीवेळा चुकून, काहीवेळा जाणूनबुजून अथवा काहीवेळा साफसफाईच्या नावाखाली आगी लावल्या जातात. यामुळे जंगल, सडे नष्ट होऊन संपूर्ण जैवविविधता संपते. याचा दूरगामी परिमाण असाच सुरू राहिल्यास नकारात्मक होऊ शकतो.
प्रजासत्ताक दिनानिमित्त (ता. २६) ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा होतात. त्यामध्ये याबाबत चर्चा होणे गरजेचे आहे. विविध नावीन्यपूर्ण निर्णय ग्रामसभेत युवकांनी, ज्येष्ठ मंडळीनी घ्यायला हवेत. वर्षातून दोनतरी ग्रामसभा या स्वच्छता नियोजन, जलसंवर्धन, निसर्ग, वनसंवर्धन, जैवविविधता संरक्षण यावर घेण्यात याव्यात, असे आवाहन ॲड. ज्ञानेश पोतकर यांनी केले. त्यांनी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
गावागावात बारमाही वाहणारे नैसर्गिक पाण्याचे स्रोत असून येथेसुद्धा मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. पर्‍या, ओढे, नद्या, तळी, खारलॅण्ड यामध्ये प्लास्टिक, काचा, थर्माकोल आणि बाकी विघटन न पावणारे साहित्य असते. ग्रामस्थांमध्ये जाणूनबुजून अथवा निसर्गाबाबत अनास्था व जनजागृती नसल्याने असे प्रकार घडत आहेत.
कोकणात कोल्हापुरी प्रकाराचे बंधारे न बांधता गावागावातील भौगोलिक परिस्थिती बघून येथील बंधारे बांधण्यात यावेत व जास्तीत जास्त जलसंचय होऊन जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरेल. वनसंवर्धन करून ग्रामीण भागात आढळणार्‍या दुर्मिळ वनस्पती व रानातील वृक्ष यांचे संवर्धन होणे जरूरी आहे. गावातील जाणाऱ्या रस्त्यांवर दुतर्फा जंगली झाडे लावणे महत्वाचे आहे. तसेच प्रत्येक गावात राखीव जंगले होणे जरूरी असून येथे जंगली झाडासोबत विविध फळझाडेसुद्धा लावायला पाहिजेत जेणेकरून माकडांचा त्रास भविष्यात कमी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT