कोकण

निवतीत विविध धार्मिक कार्यक्रम

CD

निवतीत विविध धार्मिक कार्यक्रम
वेंगुर्ले ः निवती-खालची शेळपी येथील वटसावित्री माता मंदिराचा आठवा वर्धापन दिन व शिखर कलशारोहण समारंभ २९ व ३० जानेवारीला साजरा होत आहे. उद्या (ता. २९) सकाळी ८ ते ९ पुण्याहवाचन व देवतांना आमंत्रित करणे, ९ ते १.३० कलश पूजन, देवता स्थापना, कलशारोहण, होमहवन, बलिदान, आरती, दुपारी १.३० ते ३ महाप्रसाद, सायंकाळी ५.३० ते ७ फुगड्या, ७ ते ८.३० ग्रामस्थांची भजने, रात्री ९ वाजता चिंतामणी सामंत यांचे कीर्तन, ३० ला सकाळी ९ ते १० देवीवर अभिषेक, १० ते १ महापूजा, दुपारी १ ते १.३० वा. महाआरती, तीर्थप्रसाद, १.३० ते ३ महाप्रसाद, दुपारी ३ ते ५ ओटी भरणे व हळदीकुंकू समारंभ, ५.३० ते ७ फुगड्या, सायंकाळी ७ ते ८ गणेश महिला भजन मंडळ, निवती यांचे भजन, रात्री ८ ते ११ ते ग्रामस्थांची भजने होतील. भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन देवी वटसावित्री ग्रामस्थ मंडळ, खालची शेळपी यांनी केले आहे.
----------------
कुडाळला आज कवी संमेलन
कुडाळ ः कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कुडाळ शाखेने जिल्हास्तरीय निवडक कवींचे ‘भाकरी आणि फूल’ हे कवी संमेलन व कार्यकर्ता मेळावा उद्या (ता. २९) येथील संत राऊळ महाराज महाविद्यालय येथे सकाळी दहा ते दुपारी दोन दरम्यान आयोजित केला आहे. जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांची प्रमुख उपस्थिती असलेल्या उद्‍घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुडाळ शाखाध्यक्षा वृंदा कांबळी आहेत. प्रमुख पाहुणे मालवण शाखाध्यक्ष सुरेश ठाकूर उपस्थित राहणार आहेत. कवी रुजारिओ पिंटो यांच्या अध्यक्षतेखाली ‘भाकरी आणि फूल’ हे कवीसंमेलन होईल.
--
वेंगुर्ले मानसीश्वर जत्रोत्सव आज
वेंगुर्ले ः येथील प्रसिद्ध श्री देव मानसीश्वराचा वार्षिक जत्रौत्सव माघ शुद्ध अष्टमीला उद्या (ता. २९) होणार आहे. यानिमित्त पहाटेपासून नवस फेडणे, झेंडे, केळी, नारळ अर्पण करणे आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. रात्री गॅसबत्तीच्या प्रकाशामध्ये पार्सेकर दशावतार नाट्यमंडळाचे नाटक होणार आहे. जत्रोत्सवाच्या पार्श्र्वभूमीवर वेंगुर्ले स्थानक परिसर ते पेट्रोल पंप परिसरात खेळणी, मिठाई तसेच अन्य गृहपयोगी वस्तूंची दुकाने मांडण्यात आली आहेत. भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

SCROLL FOR NEXT