rat२९३६.txt
बातमी क्र. पान ५ साठी
फोटोओळी
-rat२९p३४.jpg-
७९००७
रत्नागिरी : गणपतीपुळे येथे सायकल फेरी आरे वारे येथे आली असता सहभागी सायकलपट्टू.
लाल्या खातूंची शंभरावी सायकल सवारी
२५ सहकाऱ्यांची साथ ; डॉक्टरांनी सुचवली होती बायपास सर्जरी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० : रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य मृत्यूंजय तथा लाल्या खातू हे नियमित सायकलिंगसाठी सुपरिचित आहेत. ५० किलोमीटर लांबीच्या १०० राईड (फेरी) बद्दल आज त्यांच्यासोबत क्लबच्या २५ सदस्यांनी रत्नागिरी ते गणपतीपुळे व परत असे पन्नास किलोमीटरचे अंतर पार केले. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे रत्नागिरी जिल्ह्यातील सायकलपट्टूंकडून कौतुक होत आहे.
मारुती मंदिरपासून आज सकाळी ६.३० वाजता या फेरीला सुरवात झाली. मारुती मंदिर, फिनोलेक्स कॉलनी, परटवणेमार्गे शिरगाव, साखरतर, कासारवेली, बसणी, आरेवारे मार्गे ढोकमळे करत गणपतीपुळे येथे फेरी नेण्यात आली. यामध्ये १५ वर्षांची सायकलस्वार युवतीसह ७२ वर्षांचे आजोबा हे सायकलपट्टू सहभागी झाले होते. आरे वारे येथे या फेरीचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी लाल्याशेठ खातू यांना सायकलस्वारांनी सलामी दिली. मजल दरमजल करत ही फेरी गणपतीपुळे मंदिरात श्रींच्या दर्शनासाठी पोहोचली. मंदिर व्यवस्थापनाच्या सहकार्याने येथे श्रींचे दर्शन झाले आणि पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरवात झाली.
रत्नागिरीत ८ जानेवारीला जिल्हा सायकल संमेलन झाल्यानंतर शहरात सायकलपट्टूंची संख्या वाढू लागली आहे. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्यत्व घेण्यासाठी लहान मुलांसह मोठ्या व्यक्तीसुद्धा संपर्कात येत आहेत. व्यायाम म्हणून नियमित सायकल चालवण्यासाठी अनेकजण इच्छुक असून त्यांनी रत्नागिरी सायकलिस्ट क्लबशी संपर्क साधावा, असे आवाहन क्लबतर्फे केले आहे.
--
कोट
आज ५० किमीची १०० वी राईड करताना खूप खूप आनंद झाला. ऑगस्ट २०१९ ला मला वाटलेच नव्हते मी सायकलिंग करू शकेन. ऑगस्ट २०१९ ला हृदयात ६ अडथळे जमा झाले होते. डॉक्टरांनी बायपास सर्जरी सुचवली होती. पण मी मनोबलाने १ डिसेंबर २०२१ ते २९ जानेवारी २२ पर्यंत १७९ राईडमध्ये ५० किमीच्या १०० राईड पूर्ण केल्या आहेत. आजच्या१०० व्या राईडला माझ्या रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने साथ दिली.
- लाल्या खातू.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.