कोकण

बक्षिसपत्र न होता पाणी योजनेचे काम

CD

rat३०२२.txt

( टुडे पान ३ मेन)

हातीव गावात पाणी योजनेचे काम सुरू

विहीर, टाकीच्या जागेचे बक्षीसपत्र पूर्तता नाही ; माजी सरपंच गोंधळी यांचा आक्षेप

सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. ३० ः हर घर नलसे जल या योजनेचा संगमेश्वर तालुक्यातील अनेक गावातून बोजवारा उडाल्याच्या तक्रारी असूनही ग्रामीण पुरवठा विभाग मात्र ढीम्म असल्याने जनतेला हक्काचे जल मिळत नाही. यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाविरुद्ध जनतेतून संताप व्यक्त होत आहे. तालुक्यातील मार्लेश्वर मार्गावरील हातिव गावात जलजीवन योजनेतून पाणीयोजना मंजूर झाली आहे. यातील विहीर व टाकीसाठीचे बक्षिसपत्र झालेले नसतानाही योजनेचे कामकाज सुरू कसे करण्यात आले, असा प्रश्न माजी सरपंच विलास गोंधळी यांनी गटविकास अधिकारी देवरूख यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे.


निवेदनात म्हटले आहे, नवीन योजनेचे अंदाजपत्रक तयार झाले त्याला मंजुरी नसतानाही विहीर व टाकीचे बांधकाम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. या योजनेच्या मंजुरीबाबत माहिती ग्रा. पं. ने गावात कोणालाही दिलेली नाही. ग्रामसभेसमोर या योजनेबाबत मंजुरीपत्र न दाखवता विद्यमान सरपंच यांनी काम तूर्तास बंद करून प्रभागवार सभा घेऊन योजना गावासमोर ठेवून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे नमूद केले; मात्र मंजुरी पत्र दाखवलेले नाही व प्रभागवार सभाही अद्याप घेण्यात आलेल्या नाहीत. विहीर व टाकीसाठी जागेचे बक्षीसपत्र केलेले नाही तरीही काम कसे सुरू झाले, याचा खुलासा ग्रामसभेत केलेला नाही.
यापूर्वीही गावातील पाणीयोजनेतील विहिरीसाठी बक्षिसपत्र नसल्याने ती योजना जागामालकाने रखडवून पाणी बंद केले होते. याचीच पुनरावृत्ती या वेळीही होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच अधिकारीवर्गाला हाताशी धरून काम करून जनतेला वेठीस धरू नये, अशी अपेक्षा व्यक्त करत मागील बंद असलेल्या व या वेळच्या योजनेची तरी बक्षिसपत्रे करून पाणीयोजनेची कामे नियमानुसार व गावातील जनतेला विश्वासात घेऊन करावीत, अशी मागणी गोंधळी यांनी केली आहे. दरम्यान काही लोकप्रतिनिधींना हाताशी धरून नियमबाह्य कामे करून जनतेला पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्‍यांसंबधित अधिकारीवर्गावर कारवाई करून अशा बेकायदेशीर कामांची चौकशी होईल का? की नेहमीप्रमाणे चौकशीचा फार्स करून सर्व आलबेल आहे असे दाखवले जाईल? अशी शंका परिसरातून व्यक्त केली जात आहे.


कारवाईची मागणी...
बक्षिसपत्र नसताना कामाची वर्कऑर्डर निघाली कशी? अशी विचारणा माजी सरपंच विलास गोंधळी यांनी केली आहे. या निवेदनाची दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder: 1 ऑक्टोबरपासून 'एलपीजी'बाबतच्या नियमांमध्ये मोठे बदल; 'या' ग्राहकांना मिळणार नाही लाभ

Latest Marathi News Live Update : आदित्य ठाकरेंचा शेतात लाइट लावून शेतकऱ्यांशी संवाद

Dharashiv News : आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांनी धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा केला पाहणी दौरा; शेतकऱ्यांनी अत्यंत पोटतिडकीने आपल्या व्यथा मांडल्या

Police Commissioner Amitesh Kumar : ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई; वेळेपेक्षा भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य

Karad Ganpati Visarjan : कऱ्हाडच्या मिरवणुकीत दिसली बदलाची चाहूल; डीजेच्या दणदणाटापेक्षा वाद्यांचा गजर, गुलालएेवजी खुलला भक्तीचा रंग

SCROLL FOR NEXT