

Vaibhav Suryavanshi | RR vs CSK | IPL 2026
Sakal
RR vs CSK Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने नवा कर्णधार रियान परागच्या नेतृत्वात सोमवारी (३० मार्च) पहिल्या विजयाची नोंद केली आहे. घरच्या मैदानात गुवाहाटीमध्ये झालेल्या सामन्यात राजस्थानने चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाला ८ विकेट्सने पराभूत केले.
गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीनंतर वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) स्फोटक फलंदाजी करत राजस्थानच्या (Rajasthan Royals) विजयात मोलाचा वाटा उचलला.