कोकण

जलवाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या भागांचे होणार सर्वेक्षण

CD

rat०१३४.txt

बातमी क्र. .३४ (पान ५ साठी)

फोटो ओळी
-ratchl१३२.jpg ः
७९८२४
चिपळूण ः वाशिष्ठी नदीची पाहणी करताना मेटीराईम बोर्डाचे अधिकारी व बचाव समिती सदस्य.
---

जलवाहतुकीतील अडथळ्यांचे होणार सर्वेक्षण


वेदभूषण कनगुटकर ; बेटांमुळे पाण्याचा निचरा होण्यात अडथळे

चिपळूण, ता. २ ः वाशिष्ठी दाभोळ खाडीत गोवळकोट, कालुस्ते आणि धामणदेवी या भागात अनेक ठिकाणी अतिरिक्त गाळ साचून बेट तयार झाली आहेत. या बेटांच्या आजूबाजूने अतिरिक्त गाळ साचून महापुराचे अतिरिक्त पाणी निचरा होण्यास व जलवाहतूक करण्यास अडचण येत आहे. या सर्व भागांमध्ये सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्यात येईल, अशी माहिती उपअभियंता वेदभूषण कनगुटकर यांनी दिली.

वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा कामाला लवकरच गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनंतर मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनीही नुकतीच चिपळूणला भेट देत वाशिष्ठी नदीची पाहणी केली केली. या गाळासंदर्भातील अहवाल ते पालकमंत्री सामंत यांना देणार आहेत. चिपळूण बचाव समितीने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासकीय स्तरावरील हालचालींना वेग आला आहे. चिपळूण दौऱ्यावर आलेले पालकमंत्री सामंत यांची भेट घेऊन समितीने वाशिष्ठी नदीपात्रातील गाळ दाभोळ खाडीपर्यंत काढण्याबद्दल चर्चा केली होती. या वेळी सामंत यांनी मेरीटाइम बोर्डच्या अधिकाऱ्यांना तत्काळ या नदीपात्राची पाहणी करून गाळाबाबत माहिती मिळवून द्यावी, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मेरीटाईम बोर्डचे उपअभियंता वेदभूषण कनगुटकर, कनिष्ठ अभियंता विरेश राऊळ, त्यांचे सहाय्यक प्रवीण पवार यांनी गोवळकोट ते कालुस्ते या भागातील साचलेल्या गाळाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान चिपळूण बचाव समितीचे बापू काणे, राजेश वाजे, महेंद्र कासेकर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT