कोकण

रत्नागिरी - रोजगाराच्या नावाखाली दीडशे महिलांची फसवणूक

CD

रोजगाराच्या आमिषाने दीडशे महिलांची फसवणूक

७३ हजार लाटले ः सॅनिटरी पॅड, डिटर्जंट पावडर बनवण्याचे उद्योग
रत्नागिरी, ता. ६ ः घरगुती रोजगार मिळवून देण्याच्या नावाखाली जिल्ह्यातील दीडशे महिलांची फसवणूक झाल्याचे पुढे आले आहे. सॅनिटरी पॅड व डिटर्जंट पावडर बनवून देण्याचा रोजगार मिळवून देतो, असे या महिलांकडून सभासद शुल्क व कच्चा माल देण्यासाठी ७२ हजार ६०१ रुपयांची रक्कम घेऊन फसवणूक केल्याची तक्रार महिलांनी केली आहे. यानुसार गुहागर पोलिस ठाण्यात जळगाव येथील संदीप शरद मुळे (पाटील) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत गुहागर पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की महिलांनी १० जून २०२२ ला ‘गरज’ नावाने संदीप शरद मुळे याने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला व जिल्ह्यातील महिलांच्या संपर्कात राहून घरबसल्या सॅनिटरी पॅड व डिटर्जंट पावडर बनवून महिलांना रोजगार संधी मिळवून देतो, असे आश्वासन दिले. तसेच तालुका पातळीवर कमिटी नेमण्यास सांगितले. या कमिटीच्या माध्यमातून तेथील महिलांची सभासद फी व इतर रोख रक्कम स्वतःच्या जळगाव येथील बँक खात्यात टाकण्यास सांगितले. सुरवातीचे काही महिने लवकरच कच्चा माल पाठवून देतो, असे सांगत चालढकल केली.
काही महिलांनी याबाबत ग्रुपवर आवाज उठवला असता संदीप मुळे (पाटील) याने धमकीही दिली. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर महिलांनी गुहागर पोलिस ठाण्यात धाव घेतली. १५१ महिलांकडून सभासद फी ३५१ रुपयांप्रमाणे ५३ हजार रुपये तसेच कच्चा माल व मशीन यासाठी १९ हजार ६०० रुपये अशी एकूण ७२ हजार ६०१ रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक तुषार पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT