कोकण

कॅथॉलिक अर्बन बँकेस ''बँको 2022'' पुरस्कार

CD

कॅथॉलिक अर्बन बँकेस
‘बँको २०२२’ पुरस्कार
सावंतवाडी, ता. ६ ः बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबददल अविज् पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलेक्सी इनमा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सहकारी पतसंस्थांसाठी आयोजित ''बँको २०२२'' हा मानाचा पुरस्कार कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा.लि. सावंतवाडी या संस्थेला जाहीर झाला आहे. याबाबतची माहिती संस्थेचे अध्यक्ष पी. एफ. डॉन्टस यांनी दिली. संपुर्ण कोकण विभागातून जिल्हयातील हा मान मिळवणारी ही एकमेव संस्था आहे. राज्यस्तरावर वेगवेगळया पतसंस्थाकडून मागविण्यात आलेल्या माहितीच्या आधारे, तज्ञ निवड समितीने केलेल्या मुल्यांकनानुसार संस्थेची पुरस्करासाठी निवड करण्यात आली आहे. संस्थेचा सातत्यपुर्ण वाढता आलेख, अभिमान वाटावा अशी सर्व आदर्श प्रमाणे व ऑडीट वर्ग ''अ'' संस्थेने कायम राखला आहे. संपुर्ण प्रतिकुल, नकारात्मक परिस्थितीतून मार्गक्रमण करत संपूर्ण महाराष्ट्रात कॅथॉलिक पतसंस्थेने आपले स्थान अधोरेखीत केले आहे. आज संस्थेने राष्ट्रीयकृत बँकाप्रमाणेच आपल्या ग्राहकांना वेगवेगळया नेट बँकिगच्या सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत व सहकार क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. १६ मार्चला महाबळेश्वर येथे आयोजित पतसंस्था सहकार परिषद २०२३ मध्ये मान्यवरांच्या हस्ते पुरस्कराचे वितरण होणार आहे. संस्थेला यापुर्वी देखील सलग चार वर्ष हा पुरस्कार मिळाला आहे. ग्राहकांचे संस्थेवरील प्रेम व विश्वास यामुळे संस्था सतत प्रगतीपथावर राहिली आहे. अशा या सर्व सभासद ग्राहक, संचालक व सर्व कर्मचाऱ्यांचे अध्यक्षांनी आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banjara Morcha: बंजारा समाजाच्या मोर्चात धनंजय मुंडेंना विरोध; वंजारा-बंजारा एक असल्याच्या विधानाचा निषेध

Nepal Sushila Karki Government : नेपाळच्या सुशीला कार्की सरकारचा मोठा निर्णय! आंदोलनात जीव गमावलेल्या ‘Gen-Z’ ना शहीद दर्जा!

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर भारताच्या सायलंट किलरला मिळालं 'इम्पॅक्ट प्लेअर' मेडल; पाहा ड्रेसिंग रुममधील Video

Pratap Sarnaik : महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाकी, टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Latest Marathi News Updates : सर्वसमावेशक कर्करोग धोरण तयार करण्याचे सरकारचे निर्देश

SCROLL FOR NEXT