कोकण

हजारो आंबेडकरी अनुयांयाचे रिपाइंकडून स्वागत

CD

rat०७१०.txt

(पान २ साठी)

फोटो ओळी
-Rat७p२३.jpg ः
८१११६
मंडणगड ः माता रमाई यांच्या जयंतीकरिता मंडणगडमार्गे दापोली येथे जाणाऱ्या पर्यटकांचे स्वागत करताना जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चंडे व रिपाइंचे कार्यकर्ते.
-------------
आंबेडकरी अनुयांयाचे रिपाइंकडून स्वागत

माता रमाई जयंती ; वणंद येथे अनुयायी दाखल

मंडणगड, ता. ८ ः माता रमाई यांच्या १२५ व्या जयंतीसाठी मंडणगड मार्गाने वणंद येथे जाणाऱ्या आंबडेकरी अनुयांयाचे जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चंडे यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका शाखा मंडणगड यांच्यावतीने स्वागत करण्यात आले. भिंगळोली समर्थनगर येथे सर्व व्यवस्था करण्यात आली होती.
पोलिस निरीक्षक शैलजा सावंत यांच्या उपस्थितीत माता रमाई यांना अभिवादन करून स्वागत समारंभाची सुरवात करण्यात आली. या वेळी दलितमित्र दादासाहेब मर्चंडे, रिपाइं जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक आदेश मर्चंडे, मनीषा मर्चंडे, मनीषा खैरे, सुनील तांबे, सुप्रिया लोखंडे, शीतल मर्चंडे, संकेत तांबे, किरण पवार, विजय खैरे, गौरव मर्चंडे, विधान पवार आदी उपस्थित होते.
माता रमाई यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाकरिता मुंबई व पुणे महानगरासह राज्यातील हजारो पर्यटक मंडणगड तालुक्याच्या मार्गाने वणंदमध्ये दाखल झाले. लांब पल्ल्याच्या प्रवासामुळे येणारा थकवा महिला, वृद्ध व रुग्णाच्या समस्या लक्षात घेऊनच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका शाखा मंडणगड यांच्याकडून अनुयायांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा सरचिटणीस व नगरसेवक आदेश मर्चंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ५० स्वयंसेवक कार्यकर्त्यांनी याकरिता मेहनत घेतली. यात पाणी, सरबत, अल्पोपाहाराचे वाटप करण्यात आले. जितेंद्र जाधव, स्वप्नील धोत्रे, संकेत तांबे, विरेंद्र जाधव, रूपेश मर्चंडे, नागसेन तांबे, रामदास खैरे, संदेश खैरे या युवक पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.
--
कोट
माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या दापोली तालुक्यातील वणंद या मुळगावास भेट देण्यासाठी व माता रमाई यांना अभिवादन करण्याकरिता राज्यभरातून सुमारे २० ते २५ हजार अनुयायी वणंद येथे दाखल होतात. यातील आठ ते दहा हजार अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंडणगड तालुक्यातील मुळगाव आंबवडे येथील बाबासाहेबांच्या स्मारकासही भेट देतात. त्यांच्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मंडणगड शाखेतर्फे ६ व ७ फेब्रुवारीला समर्थनगर दापोली फाटा या ठिकाणी अनुयायांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्यासाठी पाणी, चहा, अल्पोपाहार, महिला व पुरुषांकरिता स्वतंत्र स्वच्छतागृहे, आसनव्यवस्था व विश्रांतीची आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्था करण्यात आली होती.
- आदेश मर्चंडे-सरचिटणीस रिपाइं, जिल्हा रत्नागिरी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Latest Marathi News Live Update : नसीम खान असणार काँग्रेसचे स्टार प्रचारक

SCROLL FOR NEXT