कोकण

रत्नागिरी ः जिल्ह्याचा टंचाई आराखडा अद्याप रखडलेला

CD

पान ५ साठी

टंचाई आराखडा अद्याप रखडलेला
पाणी प्रश्‍नाकडे दुर्लक्ष ; मंडणगड, खेड पडलेत मागे
रत्नागिरी, ता. ७ ः जिल्ह्याचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करण्याचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. नऊ तालुक्यांपैकी शिल्लक राहिलेल्या मंडणगड, खेड तालुक्याकडून अजूनही तालुक्याचे आराखडे आलेले नाहीत. मार्च महिन्याच्या मध्यात सरासरी टँकर मागणीला सुरवात होते. फेब्रुवारीचा पहिला आठवडा पूर्ण झाला तरीही जिल्ह्याचा आराखडा रखडला आहे.
जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून जिल्ह्याचा पाणीटंचाई आराखडा बनवला जातो. त्यासाठी पंचायत समिती स्तरावर तालुक्यांच्या आढावा बैठका घेतल्या जातात. याचे अध्यक्ष त्या त्या विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. बैठक झाल्यानंतर ग्रामपंचायतींकडून संभाव्य टंचाईची माहिती घेतली जाते. टंचाईवर मात करण्यासाठीच्या उपाययोजनांवर भर दिला जाणार्‍या आराखड्यात टँकर, विंधनविहिरी, नळपाणी योजना दुरुस्ती, टंचाईची तीव्रता वाढल्यास खासगी विहिरी अधिग्रहित करणे यांचा समावेश असतो. जलजीवन मिशनमध्ये अनेक वाड्यांचा पाणीयोजनेसाठी समावेश केलेला असल्याने ती गावे टंचाइग्रस्तमध्ये घेतली जात नाहीत.
जिल्हा परिषदेकडून तयार केलेला आराखडा जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवला जातो. तेथून तो पुढील कार्यवाहीसाठी आयुक्तांकडे पाठवला जातो. जानेवारी महिना संपत आला तरीही जिल्ह्याचा आराखडाच तयार झालेला नाही. नऊ तालुक्यांच्या टंचाई आढावा बैठका झालेल्या आहेत. मागील आठवड्यात चार तालुक्यांकडून आराखडे पाठवण्यात आलेले नव्हते. त्यातील रत्नागिरी व संगमेश्‍वर तालुक्यांचे आराखडे प्राप्त झाले आहेत. अजूनही दोन तालुक्यांचे आराखडे येणे शिल्लक आहे. पंचायत समितीकडून योग्य ती कार्यवाही तत्काळ होणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : राज्यासह देशभरातील विविध ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT