कोकण

शुल्क अपहारप्रकरणी वरिष्ठ लिपिकावर गुन्हा

CD

शुल्क अपहारप्रकरणी
वरिष्ठ लिपिकावर गुन्हा

मेडिकल कॉलेज; मनसेच्या तक्रारीची दखल

सिंधुदुर्गनगरी, ता. ८ ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शुल्क अपहारप्रकरणी वरिष्ठ लिपिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मनसेच्या तक्रारीनंतर आयुक्तांनी फौजदारी कारवाईचे आदेश दिले होते, अशी माहिती मनसेचे कुडाळ तालुकाप्रमुख प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धिपत्रकातून दिली.
मनसेतर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कारभारासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करत वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त व संचालक स्तरावर लेखी स्वरुपात तक्रारी दिल्या होत्या. यामध्ये मेडिकल कॉलेजमधील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भरणा केलेले विद्यापीठ शुल्क व अनामत रक्कम शासन खात्यावर न भरणा करता परस्पर वैयक्तिक खात्यावर स्वीकृत करून अपहार केल्याचा आरोप होता. त्यामुळे विद्यापीठाचे शुल्क निर्धारित वेळेत जमा न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता होती. यासंदर्भात तक्रारीवर वरिष्ठ स्तरावरून प्राथमिक चौकशीची कार्यवाही करण्यात आलेली होती. प्राथमिक चौकशीत विद्यार्थ्यांच्या शुल्कात घोटाळा केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आयुक्त वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या निर्देशांमुळे संचालकांनी वैद्यकीय अधिष्ठात्यांना फौजदारी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार तत्कालीन वरिष्ठ लिपिकावर ४ लाख ३२ हजार २५० रुपयांच्या अपहारप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती मनसेचे माजी कुडाळ तालुकाप्रमुख गावडे यांनी आज दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

Latest Marathi News Live Update : MPSC सचिवांना काळं फासलं, संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

SCROLL FOR NEXT