कोकण

ज्येष्ठांच्या समस्या निवारण्यासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन

CD

rat०८३.txt

(टुडे पान १ साठी)

ज्येष्ठांच्या समस्या निवारण्यासाठी हेल्पलाईन

समाजकल्याण विभाग ; टोल फ्रीवर संपर्क साधा, समस्या सांगा

रत्नागिरी, ता. ८ ः जिल्हा, राज्य नव्हे तर देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारण्यासाठी सर्व राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्र्यालयामार्फत ही हेल्पलाईन सुरू झाली आहे. १४५६७ असा हेल्पलाईन नंबर आहे. अनेक जिल्ह्यांतून ज्येष्ठ नागरिक मदतीसाठी या हेल्पलाईनची मदत घेत असल्याची माहिती पुढे आली आहे. वृद्धांना घरातून बाहेर काढण्यापासून त्यांना होणाऱ्या मारहाणीच्या समस्याचेही तत्काळ निवारण होणार आहे.
राष्ट्रीय समाजरक्षा संस्था (एनआयएसडी), सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यामध्ये ज्येष्ठांसाठीची ही राष्ट्रीय हेल्पलाईन जनसेवा फाउंडेशनद्वारे चालवली जात आहे. या हेल्पलाईनचा उद्देश हा ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी, ज्येष्ठांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे, अत्याचारग्रस्त वृद्ध व्यक्तींची काळजी घेण्यासाठी व इतर सेवा देण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. समस्या, तक्रारीच्या निवारणासाठी राष्ट्रीय हेल्पलाईनच्या या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाने कळवले आहे.
--
आम्ही येथे आपल्यासाठी आहोत...

यामध्ये हेल्पलाईनवर प्रश्न विचारल्यास तत्काळ समाधान केले जाणार आहे. याशिवाय यामध्ये वृद्धाश्रम काळजीवाहक सेवा विरंगुळा केंद्र आणि बरेच काही यामध्ये आहे. बेघर आणि अत्याचारग्रस्त ज्येष्ठांना मदत मिळणार आहे. कायदेशीर आणि पेन्शनसंबंधी समस्येवर मार्गदर्शन मिळेल. भावनिक आधारासाठी बोलू शकता, अशा सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Virat Kohli : 'तुमच्यापेक्षा माझा खेळ मी अधिक जाणतो म्हणूनच....' विराट कोहलीने टीकाकारांना दिले उत्तर

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT