कोकण

कला महाविद्यालयातील चित्रकलेचा निकाल जाहीर

CD

81372
कणकवली : येथील कला महाविद्यालयात झालेल्‍या चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.

कला महाविद्यालयातील
चित्रकलेचा निकाल जाहीर
कणकवली, ता.८ : मुद्रा एज्युकेशन ट्रस्ट मुंबई आणि सिंधुदुर्ग कला महाविद्यालय, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने कला महोत्सव २०२३ अंतर्गत चित्रकला स्पर्धा झाली. तीन गटात झालेल्‍या या स्पर्धेत जिल्ह्यातील २३० स्पर्धक सहभागी झाले.
गटनिहाय विजेते असे ः पहिली ते चौथी ‘अ’ गटात मधुरा रंजन मल्हार (सेंट उर्सुला) हिने प्रथम क्रमांक, देवर्या सुहास मुसळे (पोदार इंटरनॅशनल स्कूल) हिने द्वितीय क्रमांक तर मनस्वी दर्शन गोठणकर (आयडीयल स्कूल) हिने तृतीय क्रमांक मिळविला. उत्तेजनार्थसाठी नुरी असलम अर्थार (आयडीयल स्कूल) आणि गणेश रूपेश राणे (पोदार इंटरनॅशनल स्कूल) यांची निवड झाली. पाचवी ते सातवी या गटामध्ये मोहित निळकंठ सुतार (विद्यामंदिर हायस्कूल) याने प्रथम क्रमांक, सोनिया विलास चोडणेकर (सेंट उर्सुला) हिने द्वितीय तर गौरव मुकेश कांदे (एस.एम. हायस्कूल) याने तृतीय क्रमांक मिळविला. उत्तेजनार्थसाठी आर्या राजन साळगावकर (महालक्ष्मी कला अकादमी) आणि पुर्वा संदीप पाचंगे (विद्यामंदिर कणकवली) यांची निवड करण्यात आली. आठवी ते दहावी या गटामध्ये दुर्वा रूपेश केळुसकर (सेंट उर्सुला) हिने प्रथम क्रमांक, आर्यन सुनील पवार (विद्यामंदिर हायस्कूल) याने द्वितीय क्रमांक तर आर्या नितीन सातवसे ( जे.एस. एन.एस. व्ही.एस.एस. सिंधुदुर्ग) याने तृतीय क्रमांक मिळवला. उत्तेजनार्थसाठी अजित रविंद्र कोळी (आयडीयल इंग्लिश स्कूल) अाणि यशश्री गोपीनाथ सावंत ( विद्यामंदिर हायस्कुल) यांची निवड झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटक कला दिग्‍दर्शक अशोक साटम यांच्याहस्ते झाला. यावेळी अनंत राबाडे, मुद्रा एज्युकेशन ट्रस्टचे विश्‍वस्त ध्रुव जाधव, प्राचार्य अनिल दावल आदी उपस्थित होते. अनिल दावल यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B Visa US Rules : डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक मोठा झटका देण्याच्या तयारीत; H-1B व्हिसा पूर्णपणे बंद होणार?

Rohit Sharma Video: रोहित टीम बसमधून उतरताना पाय घसरून पडला, पोलिसांसह सारे सावरायला धावले; विराट लांब उभा राहून फक्त...

दुष्काळाच्या झळा! सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Vivo X Fold 6 ची भारतात एन्ट्री! 'या' दिवशी होणार लाँच; 200MP कॅमेरा अन् 7000mAh बॅटरीसह मिळणार दमदार फीचर्स!

Badminton Association: महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या अध्यक्षपदी अरुण लखानी

SCROLL FOR NEXT