कोकण

कोळथरेत घराला लावली आग, सात लाखाचे नुकसान

CD

rat०८३४.txt

बातमी क्र..३४ (पान ३ साठी)

फोटो ओळी
-rat८p३१.jpg ः
८१३७३
कोळथरे ः घराला लागलेली आग.
---

कोळथरेत घराला लावली आग

सात लाखाचे नुकसान ; संशयिताला अटक
दाभोळ, ता. ८ ः दापोली तालुक्यातील कोळथरे मोहल्ला येथे अम्बरी मुकादम यांच्या घराला आग लागली. या आगीत सुमारे सात लाखांचे नुकसान झाले. झालेल्या भांडणातून संशयित युसुफ सुर्वे याने हे कृत्य केले असल्याची फिर्याद मुकादम यांनी दिली. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले, की कोळथरे मोहल्ला येथील अम्बरीन मुकादम यांच्या घरी ६ फेब्रुवारीला रात्री ११ च्या सुमारास संशयित युसुफ सुर्वे आला होता व त्याने अम्बरीन यांच्या आईला धाकाबुक्की केली होती व अम्बरीनला धमकी देऊन तो निघून गेला होता. ७ फेब्रुवारीला अम्बरीन मुकादम दुपारी दाभोळ सागरी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता सुर्वे हा त्यांच्या घराचा मागील दरवाजा तोडून आत गेला. घराला आग लावून जाताना ग्रामस्थांनी त्याला पाहिल्याची तक्रार अम्बरीन मुकादम यांनी दाभोळ सागरी पोलिस ठाण्यात दिली.

अम्बरीन मुकादम यांच्या घराला आग लागल्याचे समजताच कोळथरे येथील ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली; मात्र घराजवळील रस्ता अरुंद असल्याने खेड नगर पालिकेचा आलेला अग्निशमन दलाचा बंब तेथे जाऊ शकला नाही; मात्र अन्य छोट्या वाहनांमधून तसेच घराजवळ असलेल्या एका विहिरीतून पाण्याचा पंप लावून ही आग ऑटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न ग्रामस्थांनी केले. या संदर्भात माहिती मिळताच दाभोळ सागरी पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक पूजा हिरेमठ पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या. खेडचे पोलिस उपविभागीय अधिकारी शशीकिरण काशिद हेही घटनास्थळी दाखल झाले. संशयित युसुफ महमद अली सुर्वे (रा. खोंडा, दापोली) यांच्या विरोधात दाभोळ सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT