कोकण

बिअर न दिल्याने दुकानदाराला मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे

CD

बिअर न दिल्याने दुकानदाराला
मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे

नांदगाव येथे पोलिसांची कारवाई

कणकवली,ता. ८ ः नांदगाव येथे एका बिअर शॉपी दुकानदारास मारहाण झाली. हा प्रकार आज मध्यरात्री दोनच्या सुमारास घडला. याप्रकरणी नादंगाव येथील दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. केदार खोत आणि निलेश उर्फ गोट्या कोरगांवकर (दोन्ही रा.नांदगाव), अशी त्यांची नावे आहेत.
या प्रकरणी महेश भागुराम साळवी (वय ४४, रा. नांदगाव ओटव फाटा) यांनी पोलिसात फिर्याद दिली. यात म्हटले आहे की, संशयितांनी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास एका व्यक्तीला पाठवून केदार खोत यांनी बिअर आणण्यासाठी पाठवल्याचे सांगितले. यावेळी आपण त्यांना आता बिअर देणार नाही. उद्या सकाळी या आणि बियर घेऊन जा असे सांगितले. यावेळी दोन्ही संशयितांनी नांदगाव भवानी कॉम्प्लेक्स येथील राहत्या घरी आले आणि दरवाजा ठोठावून साळवी असे हाक मारू लागले. त्यानंतर आपली मुले बाहेर आली. थोड्याच वेळात आपणही दरवाजाजवळ आल्यानंतर दोघाही संशयितांनी मारहाण केली. दरम्यान, फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. कासार्डे पोलिस दूरक्षेत्राचे चंद्रकांत झोरे अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT