कोकण

राजापूरपत्रकाराचा मृत्यू, संशयिताला पोलिस कोठडी

CD

पत्रकाराच्या मृत्यू प्रकरणात संशयिताला पोलिस कोठडी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ८ः पत्रकार शशिकांत वारीशे यांचा अपघाती मृत्यू झाला असून या प्रकरणी मोटारचालकाविरोधात पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटकही केली. मोटारचालकाला पोलिस कोठडी मिळाली आहे.
अपघातप्रकरणी संशय व्यक्त केला जात असताना या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी आता त्याच्यावर भादंवि कलम ३०२ कलम लावले आहे. तालुक्यातील कोदवली येथील पेट्रोलपंपासमोर दोन दिवसांपूवी झालेल्या अपघातामध्ये मोटार चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार पत्रकार शशिकांत वारीशे हे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीनुसार, थारचालक पंढरीनाथ आंबेरकर याच्या विरोधात राजापूर पोलिसांनी भादंवि कलम 308, 304 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर, त्याला अटक करून येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Ring Road : सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वीच नाशिकमध्ये कायदेशीर पेच! 40 हून अधिक शेतकऱ्यांची हायकोर्टात धाव; बाह्य रिंगरोडच्या कामाला लागणार ब्रेक?

पहाटे ३ वाजता झोपणे, सकाळी ७ वाजता उठणे.... CJI SuryaKant यांचा १८ तासांचा ‘नॉनस्टॉप’ दिनक्रम; सहकारी न्यायाधीशही थक्क

Latest Marathi News Live Update : भिवंडीच्या मूलचंद कंपाऊंडमध्ये ऑइलच्या गोदामाला भीषण आग

अयानचा आणखी एक कारनामा उघड; थार गाडी, नोटांचे बंडल अन् पिस्तूल आली कुठून? मोठा खुलासा...

Gold Rate Today: उच्चांकापासून सोनं 25 हजारांनी स्वस्त! आजचा 1 तोळ्याचा ताजा भाव काय?

SCROLL FOR NEXT