कोकण

वाहतूक नियम न पाळणाऱ्या 271 वाहनांवर कारवाई

CD

rat०८३९.txt

(पान ३ साठी)

वाहतूक नियम उल्लंघन २७१ जणांवर कारवाई

पूर्णगड पोलिस ठाणे ; दीड लाखांहून अधिकचा दंड

पावस, ता. ८ ः पावस परिसरात गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या २७१ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एक लाख ६३ हजार ७०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.
पूर्णगड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये बावीस गावांचा समावेश होतो. या गावांमधून रत्नागिरी ते नाटे हा सागरी मार्ग जात असल्याने या मार्गावर कायम रहदारी सुरू असते. वाहने चालवताना ती शिस्तीत सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपल्या जीवनाची काळजी करून वाहने हाकावीत यासाठी वाहतूक परिवहन शाखेतर्फे रस्ता सुरक्षा अभियान राबवले जाते. काहीजण वाहतुकीच्या नियमांचे सातत्याने उल्लंघन करतात. साहजिकच त्यांच्यावर कारवाई होते. पूर्णगड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये नोव्हेंबर २०२२ मध्ये ५९ वाहनांवर कारवाई करून २६ हजार ८०० रुपये दंड आकारण्यात आला. डिसेंबर २२ मध्ये ५६ वाहनांवर कारवाई करून ४० हजार ९०० रुपये दंड आकारला. जानेवारी २०२३ मध्ये ९६ हजाराची दंडात्मक कारवाई करण्यात आली. गेल्या तीन महिन्यांमध्ये १ लाख ६३ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
-
कोट
वाहतूक शाखेच्या वतीने प्रत्येक वाहनचालकाने नियमांचे पालन करावे यासाठी प्रयत्न केला जातो. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करावी लागते. त्याशिवाय त्यांना धाक राहत नाही.
--विजय जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक, पूर्णगड सागरी पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HDFC Bank Chairman: कोण आहेत अतनू चक्रवर्ती? गुजरातचे माजी IAS ते HDFC बँकेचे चेअरमन आणि आता अचानक राजीनामा

Pune Rain : हवामान विभागाचा अंदाज ठरला खरा; गुढी पाडव्यालाच पुण्यात पावसाची हजेरी

Latest Marathi News Live Update : कॅप्टन अशोक खरात प्रकरणात खळबळ; 3 कोटींच्या खंडणीची मागणी उघड

Ashok Kharat Arrested in Nashik : शिर्डी ते नाशिकपर्यंत पसरलंय खरातच्या पापाचं जाळं; आता SIT लावणार छडा, महाराष्ट्रात कुठे कुठे गुन्हे दाखल?

थक्क करणार क्लायमॅक्स, हमजाची धडाकेबाज एन्ट्री आणि कराचीत माजवलेला कहर, कसा आहे dhurandhar 2 ?

SCROLL FOR NEXT