कोकण

शेतकरी बंदूक परवान्याबाबत गवस यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

CD

शेतकरी बंदूक परवान्याबाबत
गवस यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
दोडामार्ग, ता. ८ ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वन्य प्राणी नुकसान करत असल्याने शेतकऱ्यांना बंदूक परवाना मिळावा, अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुपारी, नारळ, केळी, बांबू, भातशेती व अन्य बागायती पिके घेतली जातात. गेल्या काही वर्षांपासून जंगली प्राण्यांकडून पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. माकड, डुक्कर, हत्ती या प्राण्यांपासून जीवित हानी देखील होत आहे. शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेली शेती प्राणी नष्ट करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. या वन्य प्राण्यांना शेतातून हाकलून लावण्यासाठी व स्वतःच्या संरक्षणासाठी शेतकरी बंदूक परवाना देण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांना द्यावेत, अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख गवस यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UK Student Visa: ३० नोव्हेंबरपासून व्हिसाचे नियम बदलणार; भारतीय विद्यार्थ्यांनी तपासावी बँक खात्यातील रक्कम

Stray Dog Menace Badlapur : भटक्या श्वानांची दहशत जीवावर बेतली! पाठलागापासून वाचण्यासाठी दुकानात लपला अन्... बदलापूरमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू

लग्न झालंय, मुलांचाही विवाह झाला; तरी जेठालाल बबिताजींच्या मागे! अनिरुद्धाचार्य 'तारक मेहता..'बाबत बोलताना म्हणाले...

Marathi News Live Updates: उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या जागा ८० वरुन १२० होतील- अमित शहा

पगारापेक्षा खर्च जास्त! PSI देऊ शकला नाही ४४ लाखांचा हिशोब, गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT