कोकण

अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांना कोठडी

CD

अधिकाऱ्यांना मारहाण
करणाऱ्यांना कोठडी
कुडाळ, ता. ८ ः अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर व्यवसायकांकडून प्रशिक्षणार्थी नायब तहसीलदार व आंब्रड तलाठी यांना झालेल्या मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या ७ जणांना कुडाळ न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. आता ७ जणांना जामीनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल करावा लागणार आहे. या प्रकरणातील अजून काही गुन्हा दाखल असलेले काहीजण पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
अनधिकृत वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांवर महसूल विभाग कारवाई करीत आहेत. या पार्श्वभूमीवर कुडाळ औदुंबर नगर येथे प्रशिक्षणार्थी नायब तहसीलदार हजारे व आंब्रड तलाठी राठोड यांना डंपर व्यवसायिकांकडून मारहाण झाली होती. या प्रकरणी सात जणांना कुडाळ पोलिसांनी अटक केली होती. यामध्ये अक्षय वालावलकर, गौरव ठाकूर, अमोल ठाकूर, अंकित नाईक, स्नेहांकित बांदेकर, वैभव देसाई, जागृत परब यांचा समावेश आहे. पोलीस कोठडी संपल्यानंतर आज या सातही जणांना कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता या सात जणांना जामीन मिळवण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra MLC Election 2026 : पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची तारीख ठरली; आजपासून आचारसंहिता लागू

INDW vs SLW Final : स्मृती मानधनाची विश्वविक्रमी खेळी! शफाली वर्मासोबत इतिहास घडवला; भारताच्या 'सुवर्ण'पदकाचा पाया भक्कम

Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगे पाटील पुन्हा अडचणीत? आंदोलनाशी संबंधित आर्थिक व्यवहार आयकर विभागाच्या रडारवर

Kagal-Peth Naka Traffic News : कागल-पेठ नाका महामार्गाचे सहापदरीकरण रखडले; MIDC, वाहनधारकांची मोठी गैरसोय, लक्ष्मी टेकडीसह कणेरीवाडीतील रस्ते अपूर्ण

Asian Games: Smriti Mandhana ने नवा वर्ल्ड रेकॉर्ड करत घडवला इतिहास! धवनलाही मागे टाकत विराट-धोनीच्या पंक्तीत मिळवलं स्थान

SCROLL FOR NEXT