कोकण

आंगणेवाडी यात्रोत्सवात सुयोग्य नियोजनामुळे पोलिसांचे कौतुक

CD

81441
आंगणेवाडी ः येथील यात्रा कालावधीत बंदोबस्तात तैनात पोलिस अधिकारी, कर्मचारी.

आंगणेवाडी यात्रोत्सवात सुयोग्य
नियोजनामुळे पोलिसांचे कौतुक

पोलिस महानिरिक्षक; निरीक्षक यादव यांनाही श्रेय

मालवण, ता. ८ ः आंगणेवाडी यात्रोत्सवास यावर्षी अपेक्षेनुसार रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली. पहिल्यांदाच दोन दिवसांचा यात्रोत्सव पार पडला. लाखोंच्या जनसमुदायात यात्रा झाली. गर्दी नियंत्रण, कोणताही अनुचित प्रकार नाही, चोरी, पाकीटमारी असे प्रकारही घडले नाहीत. याचे श्रेय योग्य प्रकारे पोलिस बंदोबस्त नियोजन करून दिवसरात्र सेवा बजावणाऱ्या सिंधुदुर्ग पोलिस दलाचे सर्वांनी कौतुक केले. कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण पवार यांनी सिंधुदुर्ग पोलिस दलाचे कौतुक करत येथील पोलीस निरीक्षक विजय यादव यांचेही खास कौतुक केले आहे.
दोन वर्षे कोरोना निर्बंधानंतर यावर्षी आंगणेवाडी यात्रोत्सवात मोठी गर्दी होणार, या अपेक्षेने आंगणेवाडी मंडळ, जिल्हा प्रशासन व पालकमंत्र्यांनी यात्रा नियोजन केले. यात्रोत्सवात केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आदी अतिमहनीय मंडळी अन्य नेतेमंडळी यांचीही उपस्थिती होती. यात्रेपासून काही अंतरावर भाजपचा मेळावा पार पडला. आंगणेवाडी यात्रोत्सव यावर्षी महा इव्हेंट ठरला. मात्र, यात्रा यशस्वीतेसाठी या सर्वाचे नियोजन पोलीस प्रशासनाने आंगणे ग्रामस्थांच्या सहकार्याने सुयोग्य पद्धतीने केले. कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शननाखाली पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड अशी ४०० जणांची टीम आंगणेवाडी यात्रोत्सवात सेवेत होती. स्थानिक पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक विजय यादव व सर्व टीम, सर्व अधिकाऱ्यांच्या एकत्रित सेवेतून यात्रा यशस्वी पार पडली. नेते मंडळी, भाविक अनेकांनी पोलीस प्रशासनाच्या सुयोग्य नियोजनाचे विशेष कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

Latest Marathi News Live Update : दिवसभरात काय घडलं? देशविदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

MPSC Student Agitation Issue : एमपीएससी आंदोलनातील फूट; शिष्टमंडळाच्या परस्पर निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये संताप

Gangapur News : गंगापूर तालुक्यात खरीप हंगामच्या पंचनाम्याला वेग; दोन दिवसात १६ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राचा पंचनामा पूर्ण

Satara District Bank Election : भाजप, राष्ट्रवादीने वाढवले उंडाळकरांचे टेन्शन! बाळासाहेब पाटलांसह भाजपचे तीन दिग्गज मैदानात; उमेदवारीचा दावेदार कोण याचीच उत्सुकता

SCROLL FOR NEXT