कोकण

‘त्या’ मोटार चालकावर कारवाई करण्याची मागणी

CD

‘त्या’ मोटार चालकावर
कारवाई करण्याची मागणी
कुडाळ, ता. ८ ः कुडाळ उद्यमनगर येथे आर.एस.एन. हॉटेलजवळ मोटार बेदरकारपणे चालवून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी संबंधित चालकावर कारवाई करावी, अशी मागणी शहरातील सजग नागरिकांनी आज येथील पोलिस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब, योगेश राऊळ, संग्राम सावंत यांनी दिलेल्या निवेदन म्हटले आहे की, सोमवारी (ता. ६) रात्री दहा ते अकराच्या दरम्यान येथील उद्यमनगर परिसरात आर.एस.एन. हॉटेलजवळ संबंधिताने मोटार बेदरकारपणे चालवून एमआयडीसी विमानतळ बोर्डाचे नुकसान केले. गाडीचा अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी प्रवाशांना बाहेर काढायचा प्रयत्न केला असता उडवाउडवीची उत्तरे दिली. अपघात स्थळावरील व्यक्तींकडून वाहन चालक व प्रवाशी मद्यधुंद अवस्थेत होते, अशी माहिती देण्यात आली. संबंधित चालकावर कारवाई करावी. जेणेकरून मद्यधुंद अवस्थेत चालविणाऱ्या वाहन चालक व प्रवाशांना जरब बसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

IPS बुशरा बानो कोण? इन्शाल्लाह म्हटल्यानं वाद, तक्रारीनंतर तडकाफडकी बदली

Solapur News : वित्त आयोग निधी वाटपात पालकमंत्र्यांची मनमानी; जिल्हा परिषद सदस्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली तक्रार

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

SCROLL FOR NEXT