कोकण

लांजा सेतूमध्ये 50 रुपयांची जबरदस्तीने वसुली

CD

rat०९१८.txt

(टुडे पान २ साठी)

लांज्या सेतूमध्ये ५० रुपयांची वसुली

राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक ; ध्वजनिधीच्या नावाखाली प्रकार

लांजा, ता. ९ ः विविध शासकीय दाखले, प्रतिज्ञापत्र व इतर दाखल्यांसाठी येणाऱ्या सर्वसामान्य ग्रामस्थांकडून ध्वजनिधीच्या नावाखाली प्रत्येकी ५० रुपयांची रक्कम जबरदस्तीने वसुली केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. या प्रकरणी लांजा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
याबाबत बुधवारी (ता. ८) फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट लांजा तहसीलदारांकडे तक्रार केली. याबाबत माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिजित राजेशिर्के यांनी दिली. या वेळी युवक तालुकाध्यक्ष बाबा धावणे व दाजी गडहिरे यांनी सांगितले, लांजा तालुका डोंगराळ भाग असून ग्रामीण भागातून शासकीय कामासाठी लांजा तहसीलदार कार्यालयांमध्ये येण्यासाठी अधिकचा प्रवासखर्च लागतो. त्यामुळे जनतेचा इतर खर्च होतो. त्यामध्ये भर म्हणून सशस्त्र सेना ध्वजदिन निधीच्या नावाखाली जनतेची लूट चालू आहे. ध्वजदिन निधी हा शासकीय कर्मचाऱ्यांकडून संकलन करण्याचा आदेश असताना जनतेकडून जबरदस्तीने वसुली चालू आहे.
सेतू कार्यालयांमध्ये कामासाठी येणाऱ्या किंवा प्रतिज्ञापत्र संमत्रीपत्र व इतर दाखले घेण्यासाठी येणाऱ्या गोरगरीब जनतेकडून प्रत्येक कागदपत्रामागे प्रत्येकी ५० रुपये जबरदस्तीने घेतले जातात. या निधीबाबत विचारणा केली असता येथील अधिकारी निकम यांचे नाव सांगितले जाते व त्यांना विचारणा केली असता आम्हास २ लाखांचे उद्दिष्ट आहे तर मग आम्ही काय करू, असा प्रश्न केला जातो तर मग ग्रामीण भागातील गरीब जनतेने कोणाकडे दाद मागावी, अशा प्रश्र निर्माण झाला आहे. त्यामुळे ही जनतेची लूट थांबवा अन्यथा या विरोधात आंदोलन केले जाईल, असा इशारा राजेशिर्के यांनी दिला. या वेळी युवक तालुकाध्यक्ष बाबा धावणे व दाजी गडहिरे यांनी दिला आहे.
-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT