कोकण

मुख्यमंत्री शिंदे, ब्रिगे. सावंत वाढदिवस कुडाळात सामाजिक उपक्रमांनी साजरा

CD

swt923.jpg
81600
माड्याचीवाडी ः येथील जिव्हाळा सेवाश्रमात साहित्य वाटप करताना वर्षा कुडाळकर व पदाधिकारी. (छायाचित्र ः अजय सावंत)

जिव्हाळा सेवाश्रमात साहित्य वाटप
कुडाळ, ता. ९ ः येथे बाळासाहेबांची शिवसेनेच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने ठिकठिकाणी साजरा करण्यात आला. भविष्यातही सामाजिक बांधिलकी जोपासून अशा प्रकारचे उपक्रम हाती घेतले जातील, असे महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांनी बाळासाहेबांची शिवसेना स्थापन केल्यानंतर पहिलाच वाढदिवस जिल्ह्यात साजरा होत आहे. कुडाळ तालुक्याने हा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचे नियोजन केले. त्यानुसार आज मुख्यमंत्री शिंदे व माजी खासदार सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त येथील ग्रामीण रुग्णालय तसेच माड्याच्यावाडी येथील जिव्हाळा सेवाश्रम (वृध्दाश्रम) या ठिकाणी फळे, अन्नधान्याचे तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी कुडाळ तालुका प्रमुख योगेश तुळसकर, उपजिल्हा संघटक निलम शिंदे, अनघा रांगणेकर, गडकरी, श्रीमती अग्रवाल, जयदीप तुळसकर, पुंडलिक जोशी, चैतन्य कुडाळकर, सिद्धेश मोंडकर, महेंद्र सातार्डेकर, अनिरुद्ध गावडे, अरविंद करलकर उपस्थित होते. यावेळी जिव्हाळा सेवाश्रमचे संस्थाचालक सुरेश बिर्जे तसेच ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस आमदार असलेल्या वडिलांचं क्रॉस वोटिंग, लेकानं नातं तोडलं; म्हणाला, गद्दारांचा वारसा नको, प्रॉपर्टीतूनही नाव कमी करणार

Chhatrapati Sambhajinagar: महामार्गाच्या दयनीय स्थितीवर हायकोर्टाचा संताप; सरकारला इशारा

Maharashtra Weather Alert : पुढील ३ दिवस धोक्याचे ! राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळी पावसाचे संकट, हवामान खात्याचा इशारा

Modern Indian Art and Artists : अनुभवाच्या शाळेत घडलेला कलाकार; मनीष पुष्कले यांची कलात्मक यात्रा

Chhatrapati Sambhajinagar: घाटीत एआरएस इंजेक्शन उपलब्ध; श्वानदंश रुग्णांना मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT