कोकण

व्यापाऱ्यांनी पर्यटन उद्योगांकडे वळावे

CD

kan93.jpg
81637
खारेपाटण : येथील व्यापारी मेळाव्याचे उद्‌घाटन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी केले. यावेळी नितीन वाळके, राजू जठार, अरविंद नेवाळकर, दीपक बेलवलकर, स्वप्नील कल्याणकर आदी उपस्थित होते.

व्यापाऱ्यांनी पर्यटन उद्योगांकडे वळावे
प्रसाद पारकर : खारेपाटण येथे व्यापारी असोसिएशनचा मेळावा
खारेपाटण, ता. ९ : ऑनलाईन माध्यमांशी व्यापारी बांधवांना नेहमीच स्पर्धा करावी लागणार आहे. त्‍यामुळे व्यापार क्षेत्राबरोबरच पर्यटन आधारीत उद्योगांकडेही व्यापारी बांधवांनी वळावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्‍हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी केले.
खारेपाटण व्यापारी असोसिएशनच्यावतीने येथील बसस्थानकाच्या प्रांगणात व्यापारी मेळावा झाला. यात श्री. पारकर बोलत होते. मेळाव्याचे उद्‍घाटन सरपंच प्राची इस्वलकर, प्रसाद पारकर आदींच्या हस्ते दीपप्रज्‍वलन करून करण्यात आले. यावेळी जिल्‍हा व्यापारी संघाचे कार्यवाह नितीन वाळके, राजू जठार, कोषाध्यक्ष अरविंद नेवाळकर, कणकवली अध्यक्ष दीपक बेलवलकर, तळेरे व्यापारी अध्यक्ष स्वप्नील कल्याणकर, खारेपाटण ग्रामपंचायत सदस्य गुरूप्रसाद शिंदे, सुधाकर ढेकणे, जयदीप देसाई, जिल्हा व्यापारी असोसिएशनचे कार्यकारणी सदस्य योगेश गोडवे, अनंत गांधी, खारेपाटण व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष अविनाश गाठे, रमेश जामसंडेकर, प्रकाश मोहीरे, संजय धाक्रस, संकेत शेट्ये आदी उपस्थित होते.
नितीन वाळके म्‍हणाले, तरुणांनी व्यापारी संघटनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन जिल्ह्याला प्रगतीपथावर घेऊन जाणे गरजेचे आहे. यावेळी जिल्हा संघटनेचे सहकार्यवाह राजू जठार, कणकवली तालुका अध्यक्ष दीपक बेलवलकर, खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आरोग्य तसेच विविध क्षेत्रातील गुणवंत आदर्श व्यक्तीचा सत्‍कार करण्यात आला. यावेळी खारेपाटण नं. १ या शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. युवा उद्योजक व सामजिक कार्यकर्ते सुकांत वरूणकर यांचा यशस्वी युवा उद्योजक म्हणून सन्मान करण्यात आला. खारेपाटण येथील डॉ.प्रसाद मालंडकर व डॉ.उमेश बालन तसेच खारेपाटण व्यापारी असोसिएशनच्या ज्येष्ठ महिला व्यापारी म्हणून सुनीता प्रदीप शेट्ये, तसेच ज्येष्ठ व्यापारी सदानंद विष्णू देवस्थळी, तुषार रमेश कोळसुलकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT