कोकण

वाळू वाहतूक प्रकरणी सावंतवाडीत दोघांवर गुन्हा

CD

swt928.jpg
81654
सावंतवाडीः येथील पोलिस ठाण्यात जप्त करून ठेवण्यात आलेले डंपर.

वाळू वाहतूक प्रकरणी
सावंतवाडीत दोघांवर गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ः बेकायदेशीर वाळू वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी दोन डंपरवर कारवाई करत दोघांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दीपक कुमार सिंग (वय ३०, रा. देवली मालवण) व संदीप नारायण चिंदरकर (वय ३५, रा. कसाल कुडाळ) अशी डंपर चालकांची नावे आहेत. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक गणेश कराडकर यांनी आज पहाटे तीन वाजता मळगाव ब्रीज येथे केली.
दोन्ही चालक आपल्या ताब्यातील डंपरमधून वाळू वाहतूक करत होते. मळगाव ब्रीज येथे पोलिस पेट्रोलिंग करत असताना पोलिस उपनिरीक्षक कराडकर यांनी हे डंपर थांबविले. यावेळी त्यांच्याकडे वाळूचे पास आढळून आले नाहीत. याबाबत दोन्ही चालकांवर शासनाचा महसूल बुडवून विनापास वाळू वाहतूक करत असल्याचा ठपका ठेवून कारवाई केली. दोन्ही डंपर येथील पोलिसांत हजर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT