कोकण

चंदगडचा तरुण अपघातात ठार

CD

टीपः swt९३२.jpg मध्ये फोटो आहे.
81683 - रोहित गावडे

चंदगडमधील तरुण अपघातात ठार
तेरवणमधील घटना; दुचाकी दगडावर आदळली, एक गंभीर

दोडामार्ग, ता. ९ ः दुचाकी दगडावर आदळून आज एका तरुणाचा मृत्यू झाला, तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला. रोहित अशोक गावडे (वय २५, रा. हेरे, ता. चंदगड) असे त्याचे नाव आहे. अपघातात अक्षय मोहन हेरेकर गंभीर जखमी झाला. ही घटना तेरवण-रामघाटवाडी येथे पहाटे तीनच्या दरम्यान घडली.
याबाबत दोडामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः रोहित व अक्षय पहाटे तीनच्या सुमारास मोटारसायकलीने (एमएच ०९ सीटी ५४९३) गोव्यातून हेरे येथे जात होते. दुचाकी तेरवण-रामघाटवाडी वळणावर आली असता चालकाचा ताबा सुटला आणि थेट दगडाला आदळून अपघात घडला. यात चालक रोहित गावडे याचा मृत्यू झाला, तर पाठीमागे बसलेला अक्षय हेरेकर गंभीर जखमी झाला. त्याच्यावर चंदगड येथे उपचार सुरू आहेत. याबाबतची वर्दी श्रीनिवास वनकुंद्रे यांनी दोडामार्ग पोलिस ठाण्यात दिली. पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी तपास करीत आहेत.

गावडे कुटुंबावर आघात
रोहित गावडे एका पोल्ट्री फार्ममध्ये काम करायचा. त्याच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबातील कर्ता मुलगा या अपघाताने हिरावून नेला. त्याच्या मागे आई-वडील व चार विवाहित बहिणी असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील हस्तक्षेप भोवला, पोलिस अधीक्षक तुषार दोषींसह १०० पोलिसांच्या निलंबनाचे आदेश

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या KKR संघात विदर्भाच्या पठ्ठ्याला मिळाली संधी; 'या' टीम इंडियाच्या गोलंदाजाच्या जागेवर खेळणार

Mumbai Sipahi Recruitment: शिपायाच्या ८८७ जागांसाठी २ लाख १४ हजार अर्ज; मुंबई उच्च न्यायालयातील भरतीमधील धक्कादायक स्थिती, बेरोजगारीचे वास्तव!

Niphad News : 'केस कापायला नेतो' सांगून घराबाहेर पडले, अन काळजाचा थरकाप उडवणारी बातमी आली; निफाडमधील हृदयद्रावक घटना

Farsawale Baba: कोण होते 'फरसा वाले बाबा'? त्यांच्या ४०० गायींचं काय होणार? योगी सरकारने घेतला मोठा निर्णय, दोषींवर कारवाई

SCROLL FOR NEXT