कोकण

मालवण अपघात

CD

81693
काळसे ः येथे गुरुवारी झालेल्या अपघात प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेले वाहन.


काळसेत भरधाव डंपरने
पाच महिलांना उडवले
एकीचा मृत्यू; शेतावरून घरी परतताना दुर्घटना
मालवण, ता. ९ : शेतीचे काम आटोपून चालत घरी परतणाऱ्या पाच महिलांना आज भरधाव डंपरने उडवले. यात एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर चार जणी गंभीर जखमी झाल्या. रुक्मिणी पांडुरंग काळसेकर असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलविले. अपघात सायंकाळी काळसे हुबळीचा माळ येथे घडला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी ः काळसे रमाईनगर येथील रुक्मिणी पांडुरंग काळसेकर (वय ६५), रुक्मिणी विठोबा काळसेकर (५५), प्रज्ञा दीपक काळसेकर (३५), अनिता चंद्रकांत काळसेकर (५५), प्रमिला सुभाष काळसेकर (४०) शेतीचे काम आटोपून घरी परतत होत्या. हुबळीचा माळ येथील मुख्य रस्त्यावर कुडाळ - नेरूरपार येथून भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने (एम. एच-४६- एफ- ०८२७) त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की यात रुक्मिणी पांडुरंग काळसेकर (वय ६५) यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार महिला रस्त्यालगत फेकल्या गेल्या. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक राजेंद्र परब, पोलिसपाटील विनायक प्रभू, नीलेश काळसेकर, आप्पा गुराम, प्रशांत काळसेकर, शंकर काळसेकर, विवेक नाईक यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी १०८ रुग्ण वाहिकेला पाचारण करत जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक विजय यादव, पोलिस उपनिरीक्षक श्री. झांजुर्णे यांच्यासह अन्य पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

डंपर की ट्रक
काळसे हुबळीचा माळ येथे झालेल्या दुघर्टनेतील वाहनाचा दर्शनी भाग हा ट्रकसारखा तर पाठीमागील भाग डंपरच्या हौद्यासारखा असल्याचे दिसून आले. त्यामुळे वाहन नेमके कोणते, याचा संभ्रम निर्माण झाला होता. संबंधित डंपर चंदगड येथील असल्याची माहिती मिळाली असून संबंधित डंपर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दोन महिलांची प्रकृती चिंताजनक
गंभीर जखमी चार महिलांपैकी दोघींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत पुढील कार्यवाही सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हार्दिक पांड्या १० षटकं फेकू शतक नाही! गौतम गंभीरचं ऑल राऊंडरच्या भविष्याबाबत मोठं विधान; म्हणाला, नितीश कुमार रेड्डी...

IND vs AFG: थांब आधी तुझे केस नीट करू... वैभव सूर्यवंशीचा मालिका विजयानंतर अभिषेक शर्मासोबत Bromance; Viral Video

Marathi News Live Updates : शरद पवारांच्या पत्रानंतर सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; १७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे मंत्र्यांचे निर्देश

Santosh Pandit Latest News : संतोष पंडित पुन्हा व्हिडिओ करणार? जामिनावर बाहेर येताच दिला थेट इशारा; ‘मी थांबणार नाही’

Primary Teachers: पोर्टल, प्रशिक्षण, सर्वेक्षण अन् समित्या; शिक्षकांच्या ७२ कामांची यादी पाहून अध्यापनाचा प्रश्न ऐरणीवर

SCROLL FOR NEXT