कोकण

उपवडेवासीयांची जीवघेणी कसरत थांबणार

CD

swt१०३.jpg
८१७३७
उपवडेः येथे आमदार वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला.

उपवडेवासीयांची जीवघेणी कसरत थांबणार
पुलासाठी साडे तीन कोटीः आमदार नाईकांचा पाठपुरावा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १० ः माणगाव खोऱ्यातील अतिदुर्गम असलेल्या उपवडे गावात पुलाअभावी ग्रामस्थांची गैरसोय होत होती. मात्र, आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून नाबार्ड योजने अंतर्गत उपवडे येथील पूलासाठी ३ कोटी ३४ लाख मंजूर केले आहेत. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून या कामाचे आज आमदार नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. हे पुल मंजूर झाल्यामुळे उपवडेवासीयांची जीवघेणी कसरत आता थांबणार आहे.
गेली अनेक वर्षे पावसाळ्यात याठिकाणच्या कमी उंचीच्या आणि जीर्ण झालेल्या जुन्या पुलावरून पुराचे पाणी जात असल्याने वाहतूक बंद होऊन गावाचा संपर्क तुटत होता. या पुलावरून पुराच्या पाण्यात वाहून ३ जणांचा मृत्यू झाला होता. उपवडे येथील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व ग्रामस्थांनी आमदार नाईक यांच्याकडे नवीन पुलाची मागणी केली होती. मात्र, पुल बांधणीसाठी तांत्रिक अडचणी येत होत्या. परंतु, आमदार नाईक यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करून राज्यामार्फत नाबार्डकडे या पुलाचा प्रस्ताव पाठवून दुकानवाड ते उपवडे रस्त्यावर उपवडे येथे पूल मंजूर करून घेतले. त्यासाठी नाबार्ड योजने अंतर्गत ३ कोटी ३४ लाख मंजूर झाले आहेत.
आमदार नाईक म्हणाले, ‘‘कोणत्याही ठेकेदारासाठी किंवा कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही तर लोकांची उपयुक्तता आणि गरजेनुसार विकास कामे मंजूर करत आलो आहे. उपवडे गाव छोटा असला तरी पुलाच्या भूमिपूजनासाठी गावातील सर्वजण आले. यातून पुलाची गरज दिसून येते. असाच पुळास गावात साकव गरजेचा होता तो पूर्ण केला. आंबेरी येथील पूल देखील पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे याठिकाणी पावसाळ्यात लोकांची अडचण होणार नाही. मतदारसंघात जी महत्वाची कामे आहेत, ती येत्या वर्षभरात मार्गी लावली जाणार आहेत.’’ यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, राजू कविटकर, रमाकांत ताम्हणेकर, श्रेया परब, कृष्णा धुरी, रामा धुरी, सरपंच अजित परब, उपसरपंच सदानंद गवस, गणपत परब, पुळास सरपंच निकम, बाळकृष्ण दळवी, विश्राम दळवी, संतोष राऊळ, महादेव राऊळ, गोपाळ सावंत, सखाराम पालकर, कृष्णा गवस, अनंत नाईक, विष्णू भरडे, दिनकर म्हाडगूत, महेंद्र राऊळ, यशवंत कदम, संतोष सावंत, सचिन पालकर, तुषार परब, श्रीकृष्ण नेवगी, पिंटू उबारे, प्रियांका परब, सुरेखा बांदेकर, दीक्षा तवटे, निवास कारुडकर, मीनाक्षी राऊळ, श्रीकृष्ण परब, कृष्णा पंदारे, दीपक नाईक, अरविंद राणे, आनंद शेडगे, वनिता सावंत अजित परब आदी उपस्थित होते.

चौकट
स्थगित कामांसाठी प्रयत्नशीलः नाईक
झाराप तिठा ते माणगाव तिठा या रस्त्यासाठी साडेपाच कोटी रुपये मंजूर केले आहेत. लवकरच हे काम सुरु होईल. दुकानवाड येथील पूल देखील मंजूर करण्यात आला आहे. परंतु, सरकार बदलल्यामुळे काही कामांना स्थगिती देण्यात आली. त्यामुळे ते काम सुरु झाले नाही. ही स्थगिती उठविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे यावेळी आमदार नाईक यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Transfer: मोठी बातमी! पोलीस विभागात महत्त्वाचा फेरबदल; चार आयपीएस आणि दोन राज्य पोलीस अधिकाऱ्यांची बदली, कारण काय?

Viral Video : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकताच, शिवम दुबे ट्रेनने तातडीने मुंबईसाठी रवाना का झाला? भारतीय खेळाडूने सांगितलं कारण...

IPL 2026 : इशान किशन कर्णधार, अभिषेक शर्माकडे उप कर्णधारपद... संघात खांदेपालट... आणखी एक अचंबित करणारा निर्णय

Latest Marathi News Live Update : पंढरपूर येथील सांगोला पेपर चोरी प्रकरण; दोन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

मुंबईत टँकरमाफियांचा हैदोस, अडीच हजाराच्या टँकरची १० हजारांना विक्री; पालिकेत विरोधक आक्रमक

SCROLL FOR NEXT