कोकण

भूमिगत विज वाहिन्यांसाठी 295 कोटी

CD

swt१०४.jpg
८१७५७
मालवणः येथील किनारपट्टीसह शहरातील वीज वाहिन्या भूमिगत होणार आहेत.

भूमिगत विज वाहिन्यांसाठी २९५ कोटी
किनारपट्टीलगत उभारणीः देवगड, मालवण, वेंगुर्ले तालुक्‍यांसाठी योजना
राजेश सरकारेः सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १०ः सिंधुदुर्गच्या किनारपट्टीपासून दोन किलोमीटर अंतरापर्यंतच्या सर्व वीज वाहिन्या भूमिगत होणार आहेत. त्‍यासाठी केंद्राने २९५ कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. पुढील पंधरा दिवसांत ठेकेदार निश्‍चित होऊन प्रत्‍यक्ष कामाला प्रारंभ होणार आहे. वीज वाहिन्या भूमिगत झाल्‍यानंतर वादळ सदृश्य परिस्थितीत किनारपट्टीवरील गावे अंधारात जाण्याचा धोका कमी होणार आहे.
तौक्‍ते वादळाचा मोठा फटका किनारपट्टीला बसला. यात महावितरणचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले. किनारपट्टी लगतची गावे अनेक दिवस अंधारात राहिली. याचा पर्यटन व्यावसायिकांनाही मोठा फटका बसला. तौक्‍ते वादळाच्या घटनेनंतर केंद्राने सिंधुदुर्ग किनारपट्टीचे सर्वेक्षण केले होते. त्‍यानंतर आता किनारपट्टीपासून दोन किलोमीटर अंतरापर्यंतच्या सर्व वीज वाहिन्या भूमिगत करण्याच्या कामाला ‘राष्ट्रीय चक्रीवादळ धोका शमन प्रकल्प’ अंतर्गत मंजुरी दिली आहे. यात देवगड तालुक्‍यातील २०१, मालवण तालुक्‍यातील २५१ आणि वेंगुर्ले तालुक्‍यातील २२६ किलोमीटरच्या वीज वाहिन्या भूमिगत होणार आहेत. यात ११ केव्ही आणि ३३ केव्हीच्या वीज वाहिन्यांचा समावेश असल्‍याची माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी दिली.
तौक्‍ते वादळानंतर महावितरणतर्फे भूमिगत वीज वाहिन्यांबाबत सर्व्हे केला होता. यात देवगड तालुक्‍यातील २०१ किलोमीटर लांबीच्या वीज वाहिन्यांसाठी २८० कोटी, मालवण तालुक्‍यातील २५१ किलोमीटरच्या वीज वाहिन्यांसाठी २३१ कोटी आणि वेंगुर्ले तालुक्‍यातील २२६ किलोमीटर लांबीच्या वीज वाहिन्यांसाठी १६७ कोटींची मागणी केली होती. यात केंद्राने देवगडसाठी ५१ कोटी, मालवणसाठी ६४ कोटी आणि वेंगुर्ले तालुक्‍यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मंजूर झालेल्‍या २९५ कोटी रूपयांच्या भूमिगत वीज वाहिन्या कामांसाठी डिसेंबर २०२२ मध्ये निविदा मागविण्यात आल्‍या. जानेवारी २०२३ मध्ये या कामासाठी ठेकेदार निश्‍चित केला आहे. त्‍यामुळे किनारपट्टीवरील वीज वाहिन्या भूमिगत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्ह्यात सध्या मालवण शहर हद्दीतील मेढा ते राजकोट या भागात भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याची कार्यवाही पूर्ण झाली होती. त्यानंतर आता वर्षभरात जिल्ह्यातील देवगड ते वेंगुर्ले पर्यंतच्या सर्व किनारपट्टी भागातील वीज वाहिन्या भूमिगत होणार आहेत. त्‍यामुळे वादळी वारे तसेच वीज वाहिन्यांवर माडाच्या फांद्या कोसळून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार थांबणार आहेत.
किनारपट्टी भागात बहुतांश वीज वाहिन्या ह्या माडांच्या खालून गेल्‍या आहेत. त्‍यामुळे विद्युत खांबावरील वीज वाहिन्यांचे जाळे हे नेहमीच धोकादायक ठरत आले आहे. हा धोका कमी करण्यासाठी केंद्राने २००७ मध्ये आयपीडीएस योजनेतून मालवण, वेंगुर्ले या शहरांसह कणकवली आणि सावंतवाडी या नगरपालिका क्षेत्रासाठी भूमिगत वीज वाहिन्यांसाठी निधी मंजूर केला होता. मात्र, भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यासाठी होणारी रस्ता खुदाई आणि रस्त्यांची दुरूस्ती यासाठी प्रतिमिटर ९०० ते १५०० रूपयापर्यंतचा दर नगरपालिका, नगरपंचायती यांनी निश्‍चित केला होता. हा खर्च केंद्राच्या आयपीडीएस योजनेत बसत नव्हता. त्‍यामुळे चार शहरातील भूमिगत वीज वाहिन्यांची कामे रखडली होती. मात्र, आता केंद्राने पुन्हा किनारपट्टी भागातील दोन किलोमीटर पर्यंतच्या अंतरातील वीज वाहिन्यांसाठी निधी मंजूर केला आहे.

कोट
वादळसदृश्य परिस्थितीचा सर्वात मोठा फटका किनारपट्टीवरील पर्यटन व्यावसायिकांना सहन करावा लागतो. त्‍यामुळे किनारपट्टी भागातील वीज वाहिन्या भूमिगत करण्याची मागणी आम्‍ही सातत्‍याने लावून धरली होती. भूमिगत वीज वाहिन्यांसाठी केंद्राने निधी मंजूर केला ही समाधानकारक बाब आहे. आता तातडीने ही कामे सुरू होण्याची आवश्‍यकता आहे. भूमिगत वीज वाहिन्यांची योजना राबविताना दर्जेदार वीज वाहिन्यांचा वापर व्हायला हवा.
- नितीन वाळके, पर्यटन व्यावसायिक

कोट
मालवण शहरातील मेढा-राजकोट या भागात आयपीडीसी या योजनेंतर्गत भूमिगत वीज वाहिन्यांचे काम महावितरणच्या माध्यमातून मार्गी लावण्यात आले. त्‍यानंतर ही योजनाच बंद झाल्याने अन्य भागात भूमिगत वीज वाहिन्यांचे काम होऊ शकले नव्हते. आता केंद्राने एनसीआरएमपी या योजनेतंर्गत भूमिगत वीज वाहिनीच्या कामासाठी २९५ कोटी रूपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. त्‍यासाठीची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली असून लवकरच हे काम सुरू होणार आहे.
- बाळासाहेब मोहिते, कार्यकारी अभियंता महावितरण, कणकवली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT