कोकण

पावस-संक्षिप्त

CD

फोटो ओळी
-rat९p१७.jpg ः KOP२३L८१५६२ गुहागर ः साखरी बुद्रुक येथे तृणधान्य कार्यक्रमांतर्गत महिलांना मार्गदर्शन करताना कृषी सहाय्यक प्रतीक बांगर ---------

साखरीबुद्रुकला तृणधान्याबाबत मार्गदर्शन
पावस ः गुहागर तालुक्यातील साखरीबुद्रुक येथे कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ साजरा करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने नाचणी, वरई, राळा, ज्वारी, बाजरी, कोद्रा, राजगिरा, सावा या पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्व व फायदे या विषयी माहिती देण्यात आली. तसेच कोकणातील भातानंतरचे प्रमुख पीक असलेल्या नाचणीपासून बनवण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या पौष्टिक पदार्थांची माहिती देण्यात आली. त्यामध्ये नाचणीचे लाडू, नाचणीचे सत्व, नाचणीचे पापड, चकली, नाचणीची वडी, नाचणीची चकली, नाचणी बिस्कीट, नाचणीची इडली हे नाचणीचे प्रक्रियायुक्त पदार्थांची पाककृती सांगण्यात आली. या कार्यक्रमास कृषि पर्यवेक्षिका श्रीदेवी बाडगी, कृषी सहाय्यक प्रतीक बांगर व गावच्या कृषिसखी मनिषा पोमेनकर यांसह गावातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
------

जांभेकर विद्यालयाचे अॅथलेटिक्स स्पर्धेत सुयश
पावस ः चिपळूण तालुक्यातील डेरवण क्रीडा संकुलात झालेल्या जिल्हास्तरीय अॅथलेटीक्स स्पर्धेत सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयाने सुयश संपादन केले. स्पर्धेत १२ वर्षाखालील मुलगे लांब उडी स्पर्धेत आर्यन अनिल चव्हाणने सुवर्णपदक, सार्थ दीपक बोरकरने कास्यपदक, १२ वर्षाखालील मुलांच्या गोळाफेक स्पर्धेत नैतिक दीपक कदमने रौप्य व ६० मीटर धावणेत कास्यपदक व उंच उडी स्पर्धेत आर्यन अनिल चव्हाणने सुवर्णपदक, आर्य विलास पवारने रौप्यपदक पटकावले. कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सब जुनिअर अॅथलेटीक्स स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. या स्पर्धा ८ वर्षे, १० वर्षे आणि १२ वर्षाखालील मुले व मुली अशा तीन गटात घेण्यात आल्या. स्पर्धेसाठी विद्यालयातील क्रीडाशिक्षिका सौ. निधी मोरे यांनी मार्गदर्शन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला कमिन्सचा जोरदार धक्का! रोहित शर्माला 4 धावांवरच धाडलं माघारी

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT