कोकण

पत्रकार वारिशेंच्या कुटुंबाला शासनाकडून २५ लाख

CD

पत्रकार वारिशेंच्या कुटुंबाला शासनाकडून २५ लाख
पालकमंत्री उदय सामंत ; मुलाला कायमस्वरूपी नोकरी देणार
रत्नागिरी, ता. १२ ः राजापूर येथील मृत पत्रकार शशिकांत वारिशेंच्या कुटुंबीयांना शासनाकडून २५ लाख रुपयांची मदत देण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तसेच त्यांच्या मुलाला कायमस्वरुपी नोकरीचीही हमी मंत्री सामंत यांनी घेतली आहे.
रत्नागिरीतील रोजगार महामेळाव्याच्या निमित्ताने पालकमंत्री उदय सामंत यांच्या पत्रकार परिषदेत स्थानिक पत्रकारांनी राजापूर येथील मृत पावलेल्या शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी केली. वारिशे यांच्या मृत्यूमुळे त्यांचा मुलगा आणि आजी यांच्यावर संकट कोसळले आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी महाराष्ट्रातील पत्रकारांकडून सातत्याने प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. पत्रकारांच्या या मागणीची दखल घेत पालकमंत्री सामंत यांनी तत्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दहा लाख रुपये आणि इतर माध्यमातून पंधरा लाख रुपये अशी मदत मृत वारिशे यांच्या कुटुंबीयांना देण्यात येईल असे मंत्री सामंत यांनी जाहीर केले. या शिवाय वारिशे यांच्या मुलाला कायमची नोकरी देण्याची जबाबदारीही श्री. सामंत यांनी स्वीकारली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पत्रकार वारिशे यांची हत्या राजापूर येथे करण्यात आली होती. या प्रकरणी संबंधितांवर कारवाईही झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मदतीची घोषणा करण्याचे आदेश दिले आहेत. ती कशी करायची, ही जबाबदारी सरकारची आहे. अशी दुर्देवी घटना भविष्यात घडू नये याची प्रशासनाने दखल घेतलेली आहे. तसेच पुढील दौर्‍यात स्वतः जाऊन भेट घेणार आहे. सांत्वन करून व्यक्ती परत येणार नाही; मात्र त्यांच्या कुटुंबाला शासन वार्‍यावर सोडणार नाही. वारिशे कुटुंबाला मदत करण्याची जबाबदारी शासनाची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT