कोकण

पान एक-महाविद्यालयीन विद्यार्थ्याची वैभववाडीत गळफासाने आत्महत्या

CD

82577

पान एक

महाविद्यालयीन विद्यार्थ्याची
गळफास घेऊन आत्महत्या
वैभववाडीतील घटना; कारण गुलदस्त्यात, मृत फलटणचा
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १३ ः तालुक्यातील एका व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्याने खोलीत लोखंडी हुकाला गळफास घेऊन आज आत्महत्या केली. महेश अनिल गाडवे (मूळ रा. फलटण, जि. सातारा) असे मृताचे नाव आहे. शहरातील दत्तमंदिर नजीक इमारतीत तो भाड्याने राहत होता. त्याच्या खिशामध्ये सापडलेल्या चिठ्ठीत घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करीत नसल्याने हा निर्णय घेत असल्याचे नमूद केले आहे.
महेश गाडवे हा एका महाविद्यालयात चौथ्या वर्षात शिक्षण घेत होता. वैभववाडी शहरात मित्रांसमवेत तो भाड्याच्या खोलीत राहत होता. दोन दिवसांपूर्वी त्याचे मित्र गावी गेल्यामुळे तो एकटाच होता. त्याच्या खोलीच्या बाजूच्या खोलीत याच महाविद्यालयातील विद्यार्थी राहतात. आज त्यांना महेशच्या खोलीचा दरवाजा बंद दिसला. हाक मारूनही कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याला फोन केला, तरीही त्याने प्रतिसाद दिला नाही. अखेर बाजूला राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी धक्का मारून दरवाजा उघडला. त्यावेळी महेश हा मागील खोलीत लोखंडी हुकाला कापडाने गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. उपनिरीक्षक प्रवीण देसाई, सूरज पाटील, पोलिस नाईक मारुती साखरे, अभिजित मोरे, सूरज पाटील घटनास्थळी पोहोचले. त्यांनी लटकलेल्या स्थितीत असलेल्या महेशला खाली काढले; मात्र त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी केली. दरम्यान, मृताच्या शर्टच्या खिशात चिठ्ठी सापडली. यामध्ये घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नसल्यामुळे स्वखुशीने आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे.
या घटनेची माहिती मिळताच तो शिकत असलेल्या महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी तसेच शहरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांना प्रकाराबाबत माहिती दिली असून ते वैभववाडीत येण्यासाठी निघाले होते.


डॉक्टर नसल्याने
विच्छेदन कणकवलीत
वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात असलेल्या तिन्ही डॉक्टरांचा सेवा कालावधी संपला आहे. त्यामुळे रुग्णालयात एकही डॉक्टर उपलब्ध नव्हता. डॉक्टर नसल्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत विच्छेदन होऊ शकले नव्हते. अखेर कणकवली येथे मृतदेह नेण्याची वेळ पोलिसांवर आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT