कोकण

बापर्डेत आढळले मानवाकृती कातळशिल्प

CD

82745
बापर्डे ः येथील रेडेटाका परिसरात मानवाकृती कातळशिल्प आढळले.

बापर्डेत आढळले मानवाकृती कातळशिल्प

इतिहास संशोधन मंडळाला यश; वेगळे असल्याचा दावा

देवगड, ता. १४ ः तालुक्यातील बापर्डे-रेडेटाका परिसरात येथील इतिहास संशोधन मंडळाला मानवाकृती कातळशिल्प सापडले आहे. आतापर्यंत सापडलेल्या मानवाकृतींमध्ये अतिशय विलक्षण, अलंकार तोरणांनी अलंकृत केलेले शिल्प आहे. आयताकृती चौरसात सर्व जागा व्यापेल, अशी ही मानवाकृती असल्याची माहिती अभ्यासक रणजित हिर्लेकर यांनी दिली.
बापर्डे येथील एका घराच्या अंगणातील कातळशिल्प पहाण्यास रणजित हिर्लेकर व अजित टाककर गेले असता त्यांना श्रीकांत नाईकधुरे यांच्या कलमाच्या बाग परिसरात एक विलक्षण कातळशिल्प पहायला मिळाले. कोकणातील कातळचित्राच्या दुनियेत हे कातळचित्र अतिशय वेगळे असल्याचे त्यांच्या लक्षात येताच लगेचच या कातळचित्रांची साफसफाई माहिती संकलन करण्यासाठी श्री. नाईकधुरे यांच्याशी बोलुन श्री. टाककर व श्री. हिर्लेकर यांनी नव्या मोहिमेची योजना केली. संबधित जागेची साफसफाई करण्यात आली. याकामी साक्षी राणे, गौरव सोमले व निना हिर्लेकर आदी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. या कातळचित्रांची व्यवस्थित साफसफाई करुन त्याची छायाचित्रे काढण्यात आली. त्यांची मोजमापे घेऊन रेखाचित्रे केली आहेत. याकामी नाईकधुरे यांनी आवश्यक ते सहकार्य केले.
-----------
कोट
वर्षभरात तीस ते चाळीस नविन कातळचित्रे सापडली आहेत. तालुक्यात सोळा -सतरा ठिकाणी साठ -पासष्टहुन अधिक कातळचित्रांची नोंद घेतली आहे. या विषयीचा अहवाल व संशोधन लेख गुरूवारी (ता.१७) ठाणे येथील ज्ञानसाधना महाविद्यालयात भरणाऱ्या कोकण इतिहास परीषदेच्या बाराव्या राष्ट्रीय अधिवेशनात सादर केला जाणार आहे.
- अजित टाककर, प्राच्यविद्या अभ्यासक
-----------
कोट
जवळपास वीस ते पंचवीस कातळचित्रांचा एकत्रित समुह आहे. यातील मानवाकृती कातळचित्र हे आतापर्यंत सापडलेल्या सर्व मानवाकृतींमध्ये विलक्षण आहे. जवळपास पंधरा बाय सहा फुट रुंदीच्या आयताकृती चौरसात सर्व जागा व्यापेल, अशी ही मानवाकृती आहे. आतापर्यंत तालुक्यात सापडलेल्या मानवाकृती कातळचित्रात ही सर्वात मोठी मानवाकृती आहे. जवळपास चाळीस ते पन्नास चौरस फुटात ही विविध कातळचित्रे कोरलेली आहेत.
- रणजित हिर्लेकर, प्राच्यविद्या अभ्यासक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाहीच! न्यायालयीन कोठडीत वाढ

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, तर सोलापुरातील दोन गावांचा मतदानावर बहिष्कार

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT