कोकण

करजुवेत 11 सक्शन पंपाद्वारे बेकायदा वाळू उपसा

CD

करजुवेत ११ पंपाद्वारे
बेकायदा वाळू उपसा
ग्रामस्थांचा आरोप; उपशाला आशीर्वाद कोणाचा?
संगमेश्वर, ता. १४ ः तालुक्यातील करजुवे येथे ११ सक्शनपंपाद्वारे खुलेआम वाळू उपसा सुरू आहे. ना रॉयल्टी, ना परवानगी तत्त्वावर सुरू असलेल्या या उपशाला खनिकर्म, महसूलचा आशीर्वाद आहे का, असा सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे.
सायंकाळी ६ वाजल्यापासून करजुवे तिसंग परिसरात अवघ्या एक ते दीड किमी अंतरामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. देवरूख तहसील कार्यालयात ग्रामस्थांनी तक्रार करूनही हा वाळू उपसा कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महसूल कर्मचारी गावात असतानाही सुरू असलेल्या या बेसुमार वाळू उपशाबाबत स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. सक्शनद्वारे सुरू असलेला वाळू व्यवसाय तत्काळ बंद करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. रत्नागिरीतील खनिकर्म विभागानेही कारवाई करणे अपेक्षित असताना वाळूमाफियांवर चाप का बसवला जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
करजुवे येथून डिंगणीमार्गे ठिकठिकाणी वाळूचे डंपर धावत असताना डिंगणीत असलेल्या पोलिस दूरक्षेत्र, संगमेश्वर येथील पोलिस ठाण्याकडून कानाडोळा का केला जात आहे? याबाबतही उलटसुलट चर्चा सुरू आहेत. खनिकर्म विभाग, महसूल व पोलिस खात्याकडून या वाळू माफियांना अघोषित अभय दिले आहे का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

चौकट
लाखो रुपयांचा महसूल बुडतोय
करजुवेमध्ये कोणीही साधी हातपाटीची रॉयल्टी घेतलेली नाही. लाखो रुपयांचा महसूल बुडवून खुलेआम वाळूचे ढीग या गावामध्ये ठिकठिकाणी दिसून येत आहेत; मात्र गावातील तलाठी, मंडल अधिकारी यांना मात्र हे ढीग दिसत नाहीत. त्यामुळे या वाळूमाफियांचे साधले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update : ...तर मोदींबरोबर गेलेलं का चालत नाही- अजित पवार

SCROLL FOR NEXT