कोकण

महोत्सवांमुळे लोककलांची जोपासना

CD

83387
कलंबिस्त ः सैनिक पतसंस्थेचे अध्यक्ष बाबूराव कविटकर यांचा सत्कार करताना सखाराम ऊर्फ तात्या सावंत. बाजूला सुनील राऊळ, चंद्रकांत शिरसाट, सुभाष सावंत आदी.

महोत्सवांमुळे लोककलांची जोपासना

सुनील राऊळ; कलंबिस्त येथे दशावतार महोत्सवास प्रारंभ

सावंतवाडी, ता. १७ ः कलंबिस्त गावात गेली अकरा वर्षे सातत्याने दशावतार नाट्य महोत्सव घेऊन हनुमान दशावतार नाट्यमंडळ ही लोककला जिवंत ठेवण्याचे काम करीत आहे. मंडळाच्या माध्यमातून अनेक कलाकार निर्माण झाले असून हे कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागात एखादा महोत्सव सातत्याने भरवून तो यशस्वी करणे, ही खरी समाजसेवा आहे, असे प्रतिपादन सैनिक पतसंस्थेचे महाव्यवस्थापक सुनील राऊळ यांनी कलंबिस्त येथे केले.
कलंबिस्त हनुमान दशावतार नाट्यमंडळ व ग्रामस्थांतर्फे १६ ते १९ दरम्यान महाशिवरात्रोत्सवानिमित्त तेथील श्री लिंगेश्वर मंदिरात दशावतार नाट्य महोत्सव होत आहे. तेव्हा प्रमुख पाहुणे म्हणून राऊळ बोलत होते. सैनिक पतसंस्था अध्यक्ष बाबूराव कविटकर यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. व्यासपीठावर सैनिक चंद्रकांत शिरसाट, सुभाष सावंत, बाळकृष्ण देसाई, माजी सरपंच शरद नाईक, गावकर अनिल सावंत, विष्णू सावंत, भाई देसाई, रमेश सावंत, बाबू बिडये, धोंडी सावंत, विश्वजीत सावंत, सखाराम सावंत, आनंत सावंत, अंतोन रोड्रिक्स, राजेश पास्ते, कृष्णा सावंत, अजित कदम, चंदू राजगे, भाई सावंत, सुनील सावंत आदी उपस्थित होते. राऊळ यांनी महोत्सवास शुभेच्छा देऊन मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले. गेली अकरा वर्षे हनुमान दशावतार नाट्यमंडळ हा नाट्यमहोत्सव घेऊन दशावतार लोककला जोपासण्याचे काम करत आहे, असे गौरवोद्‌गार कविटकर यांनी काढले. रामभाऊ सावंत यांनी सुरू केलेल्या या दशावतार नाट्यमंडळातून अनेक दशावतार कलाकार घडले. त्यांचे कार्य आजही पुढे नेण्याचे काम मंडळाचे अध्यक्ष सखाराम सावंत व त्यांचे सहकारी करत असून हे कौतुकास्पद आहे. अशा उपक्रमांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रल्हाद तावडे यांनी सूत्रसंचालन केले. नरेंद्र बिडये यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Latest Marathi News Live Update : 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं; पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसमधून लाईव्ह

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

SCROLL FOR NEXT