कोकण

पान एक-यात्रेसाठी कुणकेश्वर सज्ज

CD

पान एक

८३५४५
श्री क्षेत्र कुणकेश्‍वर ः येथील मंदिर परिसर रोषणाईने असा उजळून निघाला आहे.
(छायाचित्र ः वैभव केळकर)


यात्रेसाठी कुणकेश्वर सज्ज
आज सोहळा ः प्रशासनाकडून चोख नियोजन
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १७ ः कोकणची दक्षिण काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्‍या तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्‍वर येथे महाशिवरात्री निमित्ताने उद्यापासून (ता.१८) यात्रा भरत आहे. तीन दिवस चालणाऱ्‍या यात्रेची बहुतांशी तयारी पूर्ण झाली असून येणाऱ्या भाविक यात्रेकरूंच्या स्वागतासाठी देवस्थानसह पोलिस तसेच प्रशासन सज्ज झाले आहे. यात्रेनिमित्ताने मंदिर व परिसरात केलेली विद्युत रोषणाई अनेकांच्या नजरा वेधून घेत आहे. यात्रेत विविध व्यापारी, हॉटेल व्यावसायिक दाखल झाले आहेत. पोलिस प्रशासनाकडून यात्रास्थळी सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन करण्याचे काम सुरू होते.
आज रात्री उशिरा मंदिरात विधीवत पूजा होऊन यात्रेला प्रारंभ होईल. तीन दिवस चालणाऱ्या यात्रेची सोमवारी (ता. २०) समुद्रस्नानाने सांगता होईल. यावेळी समुद्रस्नानावेळी सोमवती अमावस्येचा योग आल्याने भाविकांना पर्वणी आहे. यात्रेसाठी मंदिर तसेच भक्तनिवास परिसरात भाविकांसाठी दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. देवस्थानकडून भाविकांच्या दर्शनासाठी चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दर्शन मार्गावर तसेच मंदिराच्या परिसरात मंडप घालण्यात आला आहे. मंदिरावर व यात्रा परिसरात विद्युत रोषणाई केली आहे. मंदिर परिसरात श्री शंकराची प्रतिकृती उभारली आहे. यात्रा काळात आरोग्य यंत्रणा कार्यरत राहणार आहे. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी आपली यंत्रणा कार्यरत केली आहे. उद्या (ता.१८) सायंकाळी देवस्वार्‍या भेटीला येणार असल्याने त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. यात्रेत खाजा, खाद्यपदार्थ, खेळणी, कापड व अन्य साहित्याचे विक्रते, हॉटेल व्यवसायिक दाखल झाले आहेत. समुद्रकिनारी भेळ, आईस्क्रिम विक्रेते, हॉटेल आदी स्टॉल उभारण्यात आले आहेत. तेथेही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. बंदोबस्तासाठी पोलिस फौजफाटा कुणकेश्‍वरला दाखल झाला होता. पोलिस अधिकारी बंदोबस्ताचा आढावा घेत होते. यात्रेसाठी एसटीने हंगामी आगार उभारला आहे. खासगी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तारामुंबरी-मिठमुंबरी पुलावरून कुणकेश्‍वरला येणाऱ्या भाविकांच्या दृष्टीनेही नियोजन करण्यात आले आहे. तेथेही पोलिसांची बंदोबस्ताची ठाणी कार्यरत होती.

चौकट
देवस्वाऱ्या आज
कुणकेश्वर भेटीला
यात्रेत उद्या (ता.१८) मालवण वायंगणी येथील श्री देव रवळनाथ, आसरोंडी (मालवण) येथील श्री देव लिंगेश्‍वर पावणाई तसेच पळसंब (मालवण) येथील श्री जयंतीदेवी आदी देवस्वाऱ्या कुणकेश्‍वर भेटीला येणार असल्याची माहिती देवस्थानच्यावतीने देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT