कोकण

खेड ः जगबुडीवरील दुसरा पूल मार्चअखेर वाहतुकीस खुला

CD

जगबुडीवरील दुसरा पूल मार्चअखेर खुला

दाभिळ उड्डाणपूलही लागणार मार्गी; ५ कोटी ८० लाख मंजूर

खेड, ता. १९ ः मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवर बांधण्यात येत असलेल्या दुसर्‍या पुलाचे काम जवळजवळ पूर्ण झाले असून मार्चअखेर हा पूल वाहतुकीस खुला होण्याची शक्यता आहे. भरणे येथील उड्डाणपूल, जगबुडी नदीवरील पूल आणि दाभिळ येथील उड्डाणपुलाची कामे आता पूर्ण होत आली असल्याने येत्या काही महिन्यात महामार्गावरील खेड तालुक्याच्या हद्दीतील प्रवास सुसाट होणार आहे.
दरम्यान, महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आणि कल्याण टोलवेज या ठेकेदार कंपनीचे ठप्प झालेले पुलाचे काम पुन्हा सुरू करण्याची तयारी दर्शवली. कामाला सुरवात केल्यानंतर कल्याण टोलवेज या कंपनीने पुलाचे काम २ वर्षात पूर्ण केले आणि २०१९ ला जगबुडी नदीवरील नवा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. आता त्याच नव्या पुलाच्या बाजूला आणखी एक पूल उभारला जात असून, हा पूल महामार्ग चौपदरीकरणाच्या अंतर्गत उभारला जात आहे. या पुलासाठी ५ कोटी ८० लाख इतका निधी मंजूर असून या पुलाचे कामदेखील कल्याण टोलवेज या कंपनीकडून सुरू आहे. गेल्या तीन वर्षात कल्याण टोलवेज या कंपनीने दुसर्‍या पुलाचे काम जवळजवळ पूर्ण करत आणले असून मार्च २०२३ अखेर जगबुडी नदीवरील दुसरा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याचे संकेत महामार्ग बांधकाम विभागाने दिले आहेत.

ऐकेरी वाहतूक
जगबुडीवरील दुसऱ्‍या पुलाचे काम सुरू असल्याने सध्या एकाच पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू आहे; मात्र दुसरा पूल वाहतुकीस खुला झाल्यावर या दोन्ही पुलावरून एकेरी वाहतूक सुरू होणार आहे. त्यामुळे जगबुडी पुलावरील आधी किंवा आता असलेला अपघाताचा धोका कायमचा संपुष्टात येणार आहे. नव्या पुलाचे काम जवळजवळ पूर्ण झाले असून, आता दोन्ही बाजूच्या अ‍ॅप्रोच रोडचे काम सुरू करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja 2026 First Look: मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन आज! लालबागच्या राजाचा LIVE सोहळा कुठे पाहाल?

Lakhani Bolero Accident : माहेरची वाट धरली अन् काळाने घाला घातला; तीजसाठी निघालेल्या ९ जणींचा अपघातात करुण अंत

Pune Fraud News : आजार बरा करण्‍याच्‍या बहाण्‍याने भोंदू महिलेने उकळले ४५ हजार; बिबवेवाडीतील भोंदू मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : लक्ष्मण हाकेंचा अभिजीत दिपकेंना टोला; म्हणाले, ‘आधी...

PF खात्यातून इमर्जन्सीत पैसे काढायचे आहेत? EPFO ने बदलले नियम, आता मिळतील 'इतके' टक्के पैसे!

SCROLL FOR NEXT