swt२०१.jpg
८४०१४
निरवडेः सिंधुदुर्ग उपपरिसर विद्यार्थ्यांसह ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक वृंद.
निरवडेत ग्रामीण अभ्यास शिबिर उत्साहात
''सिंधुदुर्ग उपपरिसर''चा पुढाकारः विविध उपक्रमांना विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २०ः येथील मुबंई विद्यापीठ सिंधुदुर्ग उपपरिसराचे समाजकार्य विषयाच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण अभ्यास शिबिर १० ते १६ फेब्रुवारी या दरम्यान ग्रामपंचायत निरवडे येथे पार पडले. वर्गामध्ये शिकवण्यात येणारे ज्ञान प्रत्यक्ष कसे वापरायचे याचे, प्रात्यक्षिक या अभ्यासातून विद्यार्थ्यांनी जाणून घेतले.
या शिबिरात विविध उपक्रम राबविण्यात आले. प्रथम मशालफेरी काढण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, प्राथमिक शाळा यांना भेटी देऊन त्यांचे ग्रामीण भागातील कार्य विद्यार्थ्यांनी समजावून घेतले. ग्रामीण भागातील समस्या जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वेक्षण केले. गावातील ग्रामस्थांसोबत ग्रामस्वछता अभियान राबविण्यात आले. त्याचबरोबर किशोरवयीन मुली व त्यांच्या मातांसाठी ''किशोरवयातील बदल'' या विषयावर डॉ. रिया सणस यांचे व्याख्यान आयोजित केले होते. ''आपत्ती व्यवस्थापन'' या विषयावर प्रथमेश सावंत यांनी, तर ''स्वयंरोजगार व संधी'' या विषयावर यशवंत पाटकर यांनी मार्गदर्शन केले. निरवडे गावातील सर्व शाळांतील मुलांसाठी बाल मेळावा, तर महिलांसाठी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पाककला स्पर्धा, विविध मनोरंजनात्मक खेळही पार पडले. सर्व विद्यार्थी व महिलांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग दर्शविला.
समाजकार्य विद्यार्थ्यांसाठी ''समाज कार्यकर्त्याच्या भूमिका'' या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन केले होते. यामध्ये शशांक मराठे यांनी ''कौटुंबिक न्यायालयातील समुपदेशकाची भूमिका'' यावर, तर ''मानसिक आरोग्य व संधी'' विषयावर प्रवीण चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. ''आरोग्य क्षेत्र व बाल संरक्षण कक्ष यामध्ये समुपदेशकाची भूमिका'' यावर रोहन शारबिंद्रे, नंदकिशोर फोंडकर यांनी मार्गदर्शन केले. समारोपाच्या कार्यक्रमात निरवडे ग्रामपंचायतीकडून उत्कृष्ट कामगिरीसाठी सर्व विद्यार्थ्यांना व विभागाला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी निरवडे सरपंच सुहानी गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, ग्रामसेविका कदम, ग्रामपंचायत सदस्य आदेश जाधव व इतर सदस्यांचे बहुमोल सहकार्य लाभले. सिंधुदुर्ग उपपरिसर संचालक श्रीपाद वेलींग यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. प्रा. अमर निर्मळे, प्रा. माया रहाटे, प्रा. पूनम गायकवाड यांनी ग्रामीण अभ्यास शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.