कोकण

दिव्यांग पालकांच्या मुलांना स्कूलबॅग

CD

swt211.jpg
84276
कसालः दिव्यांग पालकांच्या मुलांना स्कूलबॅग वाटप कार्यक्रमात राजन तेली, प्रसन्ना देसाई, शामसुंदर लोट आदी.

दिव्यांग पालकांच्या मुलांना स्कूलबॅग
कसालमध्ये उपक्रमः भाजप दिव्यांग विकास आघाडीचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २०ः भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडीच्यावतीने कसाल येथील सिद्धिविनायक हॉलमध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत दिव्यांगांच्या २० पाल्यांना स्कूलबॅगचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे स्वागत दिव्यांग विकास आघाडी सिंधुदुर्गचे संयोजक अनिल शिंगाडे यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, दिव्यांग आघाडीचे सहसंयोजक शामसुंदर लोट, प्रकाश वाघ, भरत परब, स्वाती राऊळ आदींसह जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष तेली यांनी दिव्यांग आघाडीला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. दिव्यांग बांधवांना व्यवसायासाठी स्टॉल उपलब्ध करून देण्याबरोबरच ज्या दिव्यांग बांधवांनी घरकुलासाठी, वाहनासाठी प्रस्ताव केले आहेत, त्यांनी संयोजक तसेच सहसंयोजक यांच्याकडे नाव नोंदवून संघटनेच्या वतीने रीतसर यादी द्यावी. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामार्फत संबंधित प्रस्तावांना मंजुरी घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी वेगवेगळे प्रस्ताव करून शासनाच्या सर्व योजनांचा पुरेपुर लाभ घ्यावा. ज्यांचे प्रस्ताव केलेले आहेत, त्यांनी भाजप दिव्यांग विकास आघाडीच्या कार्यकारिणीकडे नाव देणे गरजेचे असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात नवीन पदाधिकारी नियुक्त करून त्यांना जिल्हाध्यक्ष तेली यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली. नवीन लग्न झालेल्या मूक बधिर जोडप्यांचा सत्कार भेटवस्तू देऊन करण्यात आला. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सर्व दिव्यांग बांधवाच्यावतीने आभार मानण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

Marathi News Live Updates : आज स्वातंत्र्यदिनी अमृतसरमधील अटारी-वाघा सीमेवर 'बीटिंग रिट्रीट' समारंभ पार पडला

SCROLL FOR NEXT