कोकण

पालिका कर्मचाऱ्यांकडून फिरत्या विक्रेत्यांची लूट

CD

swt2110.jpg
L84312
पुंडलिक दळवी

पालिका कर्मचाऱ्यांकडून
फिरत्या विक्रेत्यांची लूट
दळवीः प्रशासनाचे लक्ष वेधणार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ः येथील आठवडा बाजारात येणाऱ्या फिरत्या विक्रेत्यांची पालिका कर्मचाऱ्यांकडून आर्थिक लूट केली जात असून याचा फटका फिरत्या विक्रेत्यांना बसत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केला आहे. लवकरच राष्ट्रवादी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन अशा प्रकारांबाबत आक्रमक भूमिका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दळवी यांनी याबाबत पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की, शहरात येणाऱ्या फिरत्या विक्रेत्यांना ठराविक रकमेची कर पावती देऊन जास्त पैसे उकळले जातात. याबाबत पदाधिकारी देवेंद्र टेमकर, हिदायतुल्ला खान, काशिनाथ दुभाषी, राकेश नेवगी, याकुब शेख यांच्या समवेत प्रत्यक्ष व्यापाऱ्यांकडे जाऊन याची माहिती घेतली असता हा प्रकार उघड झाला. एकूणच हा प्रकार गंभीर असून अशा प्रकारे व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या संदर्भात आक्रमक भूमिका हाती घेतली जाणार असून याबाबत मुख्याधिकाऱ्यांचीही भेट घेणार असल्याचे दळवी यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT