कोकण

''अविरत''तर्फे मतिमंद शाळेस मदतीचा हात

CD

swt२१२४.jpg
८४४२७
आरोस कोंडुराः मतिमंद शाळेत शिवजयंती साजरी करताना अविरत ग्रुपचे पदाधिकारी. सोबत शिक्षक व विद्यार्थी. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

‘अविरत’तर्फे मतिमंद शाळेस मदतीचा हात
अनोखा उपक्रमः शिवजयंतीनिमित्त ५०० चिऱ्यांसह साहित्य प्रदान
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २१ ः अविरत ग्रुपच्यावतीने शिवजयंती यंदा माऊली महिला मंडळ संचालित मतिमंद मुलांची निवासी शाळा आरोस-दांडेली येथे साजरी करण्यात आली. २०१९ पासून दरवर्षी विनाअनुदानित शाळा किंवा सामाजिक सेवा संस्था यांना मदतीचा हातभार लावून अविरत ग्रुपतर्फे अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात येते.
त्याप्रमाणे यंदा सलग पाचव्या वर्षी माऊली महिला मंडळ संचलित मतिमंद मुलांची शाळा आरोस-दांडेली येथे शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक रुपेश सावंत, शिक्षिका नंदिनी आचरेकर, सरोज चव्हाण, राजू काळे, लिपिक शरद चव्हाण, अधीक्षक सुलक्षणा कोकरे व गंगाराम शेळके तसेच अविरत ग्रुपचे कृष्णा पास्ते, कृष्णराज देसाई, विनोद राणे, प्रसाद डेगवेकर, अक्षय सावंत, प्रशांत मांजरेकर, उल्हास नाईक उपस्थित होते. ग्रुपचे शिवजयंती उपक्रम राबवण्याचे हे सलग पाचवे वर्ष आहे. याप्रसंगी शाळेला इमारत उभारणीसाठी लागणाऱ्या साहित्याची मदत करण्यात आली.
नोकरीनिमित्त सावंतवाडी-गोवा असा प्रवास करणारे प्रवासी सामाजिक जाणि‍वेतून एकत्र येऊन या ग्रुपची निर्मिती करण्यात आली. २०१९ ला जीवदान मतिमंद शाळा झाराप या शाळेपासून शिवजयंती कार्यक्रम राबवण्यास सुरुवात करण्यात आली. २०२० ला मतिमंद मुलांची शाळा आरोस-दांडेली, २०२१ ला सरस्वती दयानंद छात्रालय, रोणापाल, २०२२ ला अणाव येथील आनंदाश्रय वृद्धाश्रमाला मदतीचा हात देवून आणि यंदा पुन्हा मतिमंद मुलांची शाळा आरोस-दांडेली या ठिकाणी शाळेला मदत करून शिवजयंती साजरी केली. यावेळी नूतन इमारत बांधकामासाठी १५ हजार रुपये किंमतीचे ५०० चिरे व साहित्य ग्रुपकडून देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT