कोकण

वेंगुर्लेत नाट्यमहोत्सवास प्रारंभ

CD

वेंगुर्लेत नाट्यमहोत्सवास प्रारंभ
वेंगुर्ले ः येथील श्री देवी सातेरी कला-क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित व बाळासाहेबांची शिवसेना पुरस्कृत वेंगुर्ले सातेरी मंदिर येथे नाट्यमहोत्सवाला सुरुवात झाली. २७ फेब्रुवारीपर्यंत दररोज सायंकाळी सातला नामांकित मंडळाचे नाटक होणार आहे. २१ ला महापुरुष सावंतवाडी यांचा ‘शिव भांडारेश्वर’, २२ ला आजगावकर मंडळाचा ‘देव झाला गुराखी’ नाट्यप्रयोग झाला. २३ ला सिद्धेश्वर कसई-दोडामार्ग यांचा ‘बालहत्या’, २४ ला अमृतनाथ म्हापण यांचा ‘पहिला वारकरी’, २५ ला नाईक मंडळ झरेबांबर-दोडामार्ग यांचा ‘पाप गेले पुण्यापाशी’, २६ ला वावळेश्वर तेंडोलीचा ‘स्त्रीवेशधारी गणेश’, २७ ला मोरेश्वर मोरे यांचा ‘अकल्पासुर वध’ आदी नाट्यप्रयोग होणार आहेत.
--------------
सावंतवाडीत उद्या धार्मिक कार्यक्रम
सावंतवाडी ः भटवाडी येथील श्री देव विठ्ठल मंदिर देवस्थानचा चौदावा वर्धापन दिन उत्सव शुक्रवारी (ता. २४) विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. सकाळी सातला श्री विठ्ठल-रखुमाई महापूजा, श्री दत्त महापूजा, लघुरुद्र, त्यानंतर सकाळी नऊला श्री सत्यदत्त महापूजा, दुपारी बाराल आरती व तीर्थप्रसाद, दुपारी एक ते तीन महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी पाचला स्थानिक कलाकारांचे भजन, सायंकाळी साडेसहाला आरती, रात्री साडेसातला पालखी प्रदक्षिणा, त्यानंतर रात्री साडेनऊला कारिवडे येथील श्री हेळेकर दशावतार नाट्यमंडळाचा ‘एक डाव नागिणीचा’ नाट्यप्रयोग होणार आहे.
--------------------
किनळोस आश्रमास जीवनावश्यक वस्तू
कुडाळ ः श्री पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी व श्री पुष्पसेन सावंत फार्मसी ल्युमनी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने सोशल फार्मासीस या विषयांतर्गत किनळोस येथील सक्षम आश्रमला भेट देण्यात आली. सामाजिक बांधिलकी व परिसर ज्ञान या विषयांतर्गत फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची या आश्रमास भेट होती. यावेळी अ‍ॅल्युमनी असोसिएशनतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. प्रा. युवराज पांढरे, कॅम्पस डायरेक्टर नूतन पालव, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मडुरकर, आर्या तानावडे, प्रशांत जाधव आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा ‘अँटी ड्रोन सिस्टीम’चा वापर; विनाकारण ड्रोन उडविणाऱ्यांवर होणार पोलिसांची कारवाई

Maharashtra Rain Alert : बंगालच्या उपसागरातील 'डीप डिप्रेशन'ची तीव्रता वाढली; महाराष्ट्रात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, ओडिशा-आंध्र प्रदेश किनारपट्टीवर काय स्थिती?

IND vs AUS, U19 ODI: कर्णधाराचं शतक, सेहवागची फटकेबाजी; द्रविडला विश्रांती अन् युवा भारताचा ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश

Akola Crime : हिवताप अधिकाऱ्यासह लिपिक एसीबीच्या ताब्यात; आरोग्य उपसंचालक कार्यालय परिसरात लाचप्रकरणी कारवाई

Phulambri News : मराठा क्रांती मोर्चाचा तहसीलवर मोर्चा..! अमोल खुणे व अजय बारस्कर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT