कोकण

रत्नागिरी ः 1 लाख ग्राहकांचे 24 कोटी 50 लाख थकित

CD

जिल्ह्यात १ लाख ग्राहकांचे
२४ कोटी ५० लाख थकित
प्रतिमा बदलतेयः वीज खंडित करण्याचा इशारा
रत्नागिरी, ता. २२ ः वीजबिल वेळेत भरणाऱ्या जिल्ह्यात अग्रभागी असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात दिवसेंदिस वीज थकबाकी वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील १ लाख ६ हजार ग्राहकांकडे २४ कोटी ५० लाखांची थकबाकी आहे. थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.
जिल्ह्यात घरगुती ८६ हजार ग्राहक ६ कोटी ४४ लक्ष थकित, वाणिज्य ८ हजार ८६३ ग्राहक २ कोटी ४३ लक्ष, औद्योगिक ८०४ ग्राहकांचे ७६ लक्ष थकित, कृषी ५ हजार ६७ ग्राहकांचे ९७ लक्ष थकित, कृषी इतर १२८५ ग्राहकांचे ६३ लक्ष थकित, पथदिवे १ हजार ५६१ ग्राहकांचे १० कोटी ३३ लक्ष थकित, पाणीपुरवठा ९४२ ग्राहकांचे १ कोटी ८१ लक्ष थकित, सार्वजनिक सेवा २२९३ ग्राहकांचे १ कोटी ११ लक्ष वीजबिल थकित आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १ लाख ६ हजार ८३६ ग्राहकांचे २४ कोटी ५० लक्ष वीजबिल थकबाकी आहे. रत्नागिरीपाठोपाठ सिंधुदुर्ग जिल्ह्यात घरगुती ५७ हजार १६१ ग्राहकांचे ३ कोटी ९७ लक्ष थकित, वाणिज्य ५ हजार ५ ग्राहकांचे १ कोटी २५ लक्ष, औद्योगिक ५७८ ग्राहकांचे ६२ लक्ष थकित, कृषी ११ हजार ८०४ ग्राहकांचे २ कोटी ४९ लक्ष थकित, कृषी इतर २५३ ग्राहकांचे १० लक्ष थकित, पथदिवे २ हजार ४२३ ग्राहकांचे १७ कोटी १४ लक्ष थकित, पाणीपुरवठा १ हजार ७० ग्राहकांचे २ कोटी ७४ लक्ष थकित, सार्वजनिक सेवा १ हजार ९२९ ग्राहकांचे ७४ लक्ष वीजबिल थकित आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ८० हजार २२३ ग्राहकांचे २९ कोटी ५ लक्ष वीजबिल थकबाकी आहे. वीजबिल थकवणाऱ्या ग्राहकांची जोडणी तोडण्याचा इशारा महावितरणने दिला आहे तर काही ठिकाणी प्रत्यक्षात कारवाईला सुरवात करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT