कोकण

देवगडात आजपासून कायदेविषयक शिबीरे

CD

देवगडात आजपासून
कायदेविषयक शिबिरे
देवगड, ता. २२ ः येथील तालुका विधी सेवा समिती व तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील इळये आणि शिरगाव या गावांमध्ये मोबाईल व्हॅनद्वारे कायदेविषयक जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले आहे. उद्या (ता. २३) इळये ग्रामपंचायतीत, तर शुक्रवारी (ता. २४) शिरगाव ग्रामपंचायतीत शिबिर होईल. शनिवारी (ता. २५) जामसंडे येथील श्री. मो. गोगटे हायस्कूलमध्ये मोबाईल व्हॅन लोकअदालतीचे आयोजन केले आहे.
इळये ग्रामपंचायतीत उद्या सकाळी दहाला आयोजित शिबिरात निवृत्त न्यायाधीश एस. ए. उपाध्ये, अ‍ॅड. गिरीश भिडे, अ‍ॅड. सिद्धेश माणगावकर, अ‍ॅड. आरती दामले मार्गदर्शन करणार आहेत. शिरगाव ग्रामपंचायतीत शुक्रवारी (ता. २४) सकाळी दहाला आयोजित शिबिरात निवृत्त न्यायाधीश एस. ए. उपाध्ये, अ‍ॅड. संगीता कालेकर, अ‍ॅड. समृद्धी साटम, अ‍ॅड. मिल्केशा सांगळे, अ‍ॅड. मैथिली खोबरेकर मार्गदर्शन करतील. शनिवारी (ता. २५) सकाळी दहाला जामसंडे येथे आयोजित मोबाईल व्हॅन लोकअदालतीत पॅनेलप्रमुख म्हणून निवृत्त न्यायाधीश श्री. उपाध्ये व पॅनेल सदस्य म्हणून अ‍ॅड. इंद्रनील ठाकूर, अ‍ॅड. वीणा लिमये, अ‍ॅड. अन्वी कुळकर्णी हे काम पाहणार आहेत. या मोबाईल व्हॅन लोकअदालतीत दिवाणी व फौजदारीकडील तसेच वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन येथील दिवाणी न्यायाधीश एस. बी. वाळके यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! India vs Pakistan सामना १५ फेब्रुवारीलाच होणार; मोहसिन नक्वी यांचा खोटारडेपणा उघड

Ajitdada Pawar : बारामती खरेदी-विक्री संघाचे ऐतिहासिक पाऊल; आता 'अजितदादा पवार' नावाने ओळखली जाणार संस्था, संचालक मंडळाचा मोठा निर्णय

Hasan Mushrif : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबत हसन मुश्रीफ स्पष्टच म्हणाले...

IIT Bombay Research : रेशीमकिडे न मारता मिळणार रेशीम! IIT बॉम्बेचा 'जीवोदय' प्रकल्प यशस्वी; कोल इंडियाच्या पाठिंब्याने प्रयोग, वाचा सविस्तर

Sensex Today : अवघ्या 20 मिनिटांत शेअर बाजारात 20 लाख कोटींचा नफा! गुंतवणूकदार मालामाल, ऐतिहासिक वाढीमागची ही '3' मोठी कारणं

SCROLL FOR NEXT