कोकण

शिवाजीराव भिसेंचे क्रीडा क्षेत्रात योगदान

CD

swt2313.jpg
84757
सावंतवाडीः येथील कळसुलकर हायस्कूलमध्ये शिवाजीराव भिसे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी दिलीप वाडकर, संतोष वैज, मुकुंद वझे, अनिल भिसे आदी.

शिवाजीराव भिसेंचे क्रीडा क्षेत्रात योगदान
मान्यवरांचे मत ः सावंतवाडीत स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ः क्रीडातपस्वी (कै.) शिवाजीराव भिसे यांचा स्मृतिदिन कार्यक्रम सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी, सावंतवाडी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालयात साजरा झाला. भिसे यांचे सावंतवाडीतील क्रीडा क्षेत्रामध्ये प्रचंड योगदान होते. सावंतवाडीतील कळसुलकर हायस्कूलच्या क्रीडा इतिहासात त्यांनी केलेले काम अलौकिक दर्जाचे होते, असे प्रतिपादन भिसे यांचे शिष्य दिलीप वाडकर यांनी केले. यावेळी त्यांनी भिसे यांनी त्या काळात सावंतवाडीतील क्रीडा उपक्रमांसाठी केलेल्या मदतीची आठवण करून दिली.
भिसे यांच्या काळात आलेले अनेक अनुभव ज्येष्ठ शिक्षक संतोष वैज यांनी करून त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे खजिनदार मुकुंद वझे यांनी त्यांना अल्पकाळ शिक्षक म्हणून लाभलेल्या भिसे यांच्याकडून अस्खलित हिंदीमधून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सूचना तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्याबद्दल वाटणारी आदरयुक्त भीती याबाबतच्या आठवणी अध्यक्षीय भाषणातून कथन केल्या. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे खजिनदार मुकुंद वझे, प्रशालेचे मुख्याध्यापक एन. पी. मानकर, भिसे यांचे चिरंजीव प्रसिद्ध छायाचित्रकार अनिल भिसे, पुतणे अरुण भिसे, क्रीडा मार्गदर्शक दिलीप वाडकर, प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक संतोष वैज, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप सावंत, भिसे यांचे माजी विद्यार्थी महेश देऊलकर आदी उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनिल भिसे यांनी शाळेतील दोन गरीब होतकरू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मानकर यांनी केले. सूत्रसंचालन ए. जे. ठाकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT