कोकण

दुग्‍धोत्‍पादनातून गावची प्रगती साधा

CD

85027
सोनवडे तर्फ कळसुली : येथील कार्यक्रमात आमदार वैभव नाईक यांनी संस्था नोंदणी प्रमाणपत्र संस्‍थेचे चेअरमन काशीराम घाडी यांच्याकडे सुपूर्त केले.

दुग्‍धोत्‍पादनातून प्रगती साधा

वैभव नाईक : सोनवडे दुग्‍ध संस्थेला नोंदणी प्रमाणपत्र

कणकवली, ता.२४ : विठ्ठलादेवी दुग्‍ध संस्थेच्या माध्यमातून प्रतिदिनी हजार लिटर दुधाचे संकलन व्हायला हवे. तसेच दुग्‍ध प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठीही या संस्थेने पुढाकार घ्यावा. त्‍यासाठी लागणारे सहकार्य आम्‍ही देऊ, अशी ग्‍वाही आमदार वैभव नाईक यांनी दिली.
सोनवडे तर्फ कळसुली येथील विठ्ठलादेवी दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्थेची नुकतीच नोंदणी झाली. या नोंदणीचे प्रमाणपत्र आमदार वैभव नाईक यांच्याहस्ते संस्थेचे चेअरमन काशीराम घाडी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. यावेळी श्री.नाईक यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुका प्रमुख महेश सावंत, उपतालुका प्रमुख सचिन कदम, युवासेना विभागप्रमुख निशांत तेरसे, गुरु मेस्त्री, रुपेश घाडी, काशीराम घाडीगावकर, उत्तम बांदेकर, संतोष घाडीगावकर, भिकाजी घाडी, शरद घाडी, धनुर्धर घाडी, शारदा घाडीगावकर, संदिप घाडी, दीपक घाडी, विनोद घाडीगावकर, भिकाजी घाडीगावकर, सदाशिव गुरव, मोहन घाडी, उत्तम घाडी, शरद घाडी, दीपक घाडीगावकर आदी उपस्थित होते.
--
शेतकऱ्यांना आवाहन
श्री.नाईक म्‍हणाले, शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन विठ्ठलादेवी दुग्ध व्यवसायिक सहकारी संस्था, सोनवडे तर्फ कळसुली या कृषी संस्थेची स्थापन केली ही महत्‍वाची बाब असून आता पंचक्रोशीत या संस्थेची व्याप्ती वाढवायला हवी. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथील गोकुळ दूध संघ देखील सिंधुदुर्गातील दुग्ध संस्थाना सहकार्य करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच दुग्ध व्यवसायाकडे वळावे आणि आपली आर्थिक उन्नती साधावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT