कोकण

धर्मवीर संभाजी महाराजांचे स्मारकस्थान निर्माण करावे

CD

rat२४४८.txt

बातमी क्र..४८ (पान ३ साठी)

धर्मवीर संभाजी महाराजांचे स्मारकस्थान निर्माण करावे

माजी आमदार प्रमोद जठार ; उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

संगमेश्वर, ता. २५ ः रत्नागिरी जिल्ह्यातील कसबा संगमेश्वर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्यदिव्य स्मारकस्थान निर्माण करण्यात यावे त्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भरीव तरतूद करण्यात यावी, अशी मागणी कणकवलीचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसे निवेदन त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दिले असल्याची माहिती जठार यांनी दिली आहे.
जठार यांनी मराठा हिंदवी साम्राज्याचे प्रथम युवराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना रत्नागिरी जिल्ह्यातील कसबा येथे अटक होऊन पुढे निर्घृण हत्या करण्यात आली, हे सर्वांना माहित आहे. याच कारणासाठी येथे एक भव्यदिव्य स्मारक भवन असावे, अशी येथील जनतेची भावना आहे. तसेच कसबा येथून सुरवात केल्यास पुढे कारभाटले येथे म्हाळोजी घोरपडे यांचे समाधीस्थान, त्याच्या जवळच अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले शिवमंदिर, शृंगारपूर येथे महाराणी येसूबाई साहेबांचे माहेर आणि प्रत्यक्ष थोरले छत्रपती आणि छत्रपती संभाजी राजे यांच्या वास्तव्याने पावन झालेले कसबा हे गाव अशी एक ऐतिहासिक मार्गिका येथे उपलब्ध आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत बहुमूल्य ठेवा असे याचे वर्णन होईल. त्यामुळे या परिसरातील ऐतिहासिक ठेव्याचे जतन संवर्धन व्हावे या दृष्टीने राज्य शासनाने कार्यवाही करावी, अशी मागणी जठार यांनी केली आहे.
या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात यावा. तसेच वस्तूसंग्रहालय आणि संदर्भग्रंथ वाचनालय, ध्वनी-प्रकाश कार्यक्रम, बगीचा, भवानीमातेचा पुतळा आणि छोटेखानी मंदिर, विश्रांतीगृह (रिसॉर्ट), अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थाचे फूड कोर्ट, म्युझिकल फाउंडेशन, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी थिएटर, व्हीआयपी विश्रांतीगृह उभारण्यात यावे, अशी मागणी जठार यांनी केली आहे.
----

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT