कोकण

रेखाचित्र शाखा कर्मचाऱ्यांना न्याय देऊ

CD

85262
कुडाळ ः महाराष्ट्र राज्य रेखाचित्र संघटनेचे अध्यक्ष जा. की. जाफरी यांचे स्वागत करताना जिल्हाध्यक्ष राजू तावडे, सचिव प्रसाद कापडोसकर. सोबत सुधीर गव्हाणे, वाल्मिक दारुणकर, प्रशांत कहाते, एम. ए. रहीम, तुकाराम कुमठेकर आदी.


रेखाचित्र शाखा कर्मचाऱ्यांना न्याय देऊ

जा. की. जाफरी ः जिल्हा संघटनेतर्फे कुडाळात स्वागत

सावंतवाडी, ता. २५ ः पाचव्या वेतन आयोगातील त्रुटींमुळे प्रलंबित असलेली १९९६ ते २००६ या कालावधीतील वेतनाची थकबाकी वन विभागाच्या रेखाचित्र शाखेतील कर्मचाऱ्यांना मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रेखाचित्र कर्मचारी संघटना निश्चित प्रयत्न करेल, अशी ग्वाही संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष जा. की. जाफरी यांनी कुडाळ येथे दिली. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने १४ मार्चला पुकारलेल्या संपात रेखाचित्र संघटनेच्या सभासदांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्र राज्य रेखाचित्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जाफरी, सचिव सुधीर गव्हाणे, प्रमुख सल्लागार वाल्मिक दारुणकर, विभागीय सचिव प्रशांत कहाते, एम. एम. रहीम हे काल (ता. २४) कुडाळ येथे आले होते. यावेळी रेखाचित्र संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजू तावडे, सचिव प्रसाद कापडोसकर, वन विभागाचे सेवानिवृत्त आरेखक तुकाराम कुमठेकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी वनखात्याच्या रेखाचित्र कर्मचाऱ्यांना अद्याप १९९६ ते २००६ या कालावधीतील वेतनाची थकबाकी मिळाली नसल्याचे रेखाचित्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. ही वेतन थकबाकी केवळ कृषी विभागास मिळाली होती. महाराष्ट्र राज्य रेखाचित्र संघटनेने याबाबत महाराष्ट्र प्राधिकरण न्यायालयात दावा दाखल करून पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व मृदू संधारण विभागातील रेखाचित्र शाखेच्या कर्मचाऱ्यांनाही या वेतनाची थकबाकी मिळवून दिली. त्याच धरतीवर आपण वन विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना ही थकबाकी मिळवून देण्यासाठी निश्चित प्रयत्न करू, अशी ग्वाही जाफरी यांनी दिली. याबाबत लवकरच वन विभागातील रेखाचित्र कर्मचाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinhagad Fort : जिथे शिवरायांच्या मावळ्यांनी पराक्रम गाजवला, त्या सिंहगडावर उभारणार १०० फुटी भगवा ध्वज

Rain Update : राज्यात सोमवारपर्यंत पावसाचा अंदाज; कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भ, मराठवाड्याला दिलासा शक्य

Siddhesh Parab Arrested : शिरोड्यात माजी उपसभापतीच्या घरात पोलिसांची रेड; शिंदे शिवसेनेच्या सिद्धेश परब यांना अटक, सिंधुदुर्गात खळबळ

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

Ganeshotsav : उत्सवात व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवा; गणेशोत्सव आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आदेश

SCROLL FOR NEXT