कोकण

बोरघर नातूनगर हद्दीवरील मोरीवरील डांबरी जोडपट्टा ठरतोय जीवघेणा

CD

rat25p24.jpg
85285
खेडः बोरघर नातूनगर नजीकचा महामार्गावरील धोकादायक जोडपट्टा.
------------
नातूनगर हद्दीवरील
डांबरी जोडपट्टा जीवघेणा
खेड, ता. २५ः मुंबई-गोवा महामार्गावरील बोरघर नातूनगर हद्दीवरील मोरीवर काँक्रिट पट्ट्यांना जोडण्यासाठी दोन्ही बाजूला डांबरी जोडपट्टा मारण्यात आला आहे. मारलेला जोडपट्टा उंच झाला आहे. वेगाने येणाऱ्या वाहनचालकांना याचा अंदाज येत नसल्याने त्या ठिकाणी वाहने उंच उडतात. त्यामुळे चालकाचे स्टेअरिंगवर नियंत्रण राहत नसल्याने वाहने अचानक वेडीवाकडी वळतात व दुभाजकावर किंवा साईडच्या संरक्षक कठड्यावर आदळतात व मोठे अपघात होत आहेत.
या पट्ट्याचा वाहनचालकांना, प्रवाशांना त्याचबरोबर रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका आहे. शुक्रवारी (ता. २४) मोटारीचा अपघात याच कारणाने झाला. तसेच केवळ बोरघर स्टॉपवरच क्रॉसिंग ठेवल्याने आणि सर्व्हिस रोड नसल्याने नातूनगर ते बोरघर त्याचबरोबर चिंचवली फाटादरम्यान वाहनचालक वाहने उलट्या मार्गाने हाकत आहेत. हा प्रकार अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे या दरम्यान सर्व्हिस रोड त्वरित बनवण्यात यावा, अशी मागणी नागरिकांची आहे. संबंधित खात्याने याची दखल न घेतल्यास बोरघर, नातूनगर व चिंचवली येथील नागरिकांसोबत भाजपा सरचिटणीस व बोरघरचे माजी सरपंच उदय बोरकर, चिंचवलीचे माजी उपसरपंच अनंत कांदेकर, बोरघरचे शिवसेना शाखाप्रमुख किशोर बोरकर, बोरघरच्या सरपंच धारा बोरकर, उपसरपंच प्रिया पवार, बहुसंख्य सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रास्ता रोको अंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT